शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; सन्मानच नाही तर युतीधर्म पाळायचा कसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 22:14 IST

निवडणुकीच्या प्रचाराला साधे वाहन तर सोडा दुपट्टाही मिळाला नाही. कुणी सन्मानाने बोलवायला तयार नाही. अशा स्थितीत युतीधर्म पाळायचा कसा असा सवाल भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातील शिवसैनिक आता थेट विचारत आहेत.

ठळक मुद्देशिवसैनिकांचा सवाल : वाहनाचे सोडा, साधा दुपट्टाही नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : निवडणुकीच्या प्रचाराला साधे वाहन तर सोडा दुपट्टाही मिळाला नाही. कुणी सन्मानाने बोलवायला तयार नाही. अशा स्थितीत युतीधर्म पाळायचा कसा असा सवाल भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातील शिवसैनिक आता थेट विचारत आहेत. भाजपाने आपली स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबविणे सुरु केले असून शिवसेनेच्या नेत्यासह शिवसैनिकांनाही अडगळीत टाकल्याचे चित्र सध्या मतदार संघात आहे.राज्यात भाजपा-सेना युतीची घोषणा लोकसभा निवडणुकीपूर्वी झाली. तत्पूर्वी सेना आणि भाजप एकमेकांवर कुरघोडी करीत होते. भंडारा जिल्हा शिवसेनातर भाजपावर आक्रमकपणे तुटून पडत होती. स्थानिक प्रश्नांवर रस्त्यावर उतरुन आंदोलने केली. सत्ताधारी पक्षाचा घटक पक्ष असतांनाही सेनेने जनतेच्या प्रश्नांवर रान उठविले होते. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपा-सेना युती झाली. जिल्ह्यात सेना आणि भाजपा नेत्यांचे मनोमिलन झाले असले तरी शिवसैनिक मात्र त्याच जोशात आहेत.आता लोकसभेची निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार सुनील मेंढे रिंगणात आहेत. भाजपाचा प्रचार गावागावांत जोमात सुरु आहे. मात्र या प्रचारात कुठेही शिवसैनिक दिसत नाहीत. नामांकन दाखल करण्याच्या दिवशी काढण्यात आलेल्या रॅलीत शिवसैनिक उपस्थित होते. मात्र त्यानंतर त्यांना कुणी सन्मानाने २बोलावल्याचे नसल्याचे शिवसैनिक खाजगीत बोलत आहेत. कुणी आम्हाला सन्मानाने प्रचाराला या, असे सांगत नाही. वाहनही दिले नाही. तर एवढेच काय साधा दुपट्टाही आम्हाला मिळाला नसल्याचे शिवसैनिक सांगत आहेत. त्यामुळे शिवसैनिक सध्यातरी आपल्या घरीच असल्याचे चित्र दिसून येते.नाराजीचा उद्रेक झाला तर...भाजपा-शिवसेनेची वरिष्ठ पातळीवर युती झाली. शिवसैनिक भाजपाच्या प्रचारासाठी तयारीत आहेत. परंतु सन्मानाने बोलावित नसल्याने कुणी जायला तयार नाही, अशीच वागणुक शिवसैनिकांना मिळाली तर त्याचा उद्रेक होऊ शकतो. त्यानंतर कोणताच नेता या शिवसैनिकाचा उद्रेकाला शांत करु शकरणार नाही.शिवसेनेची गावागावांत बांधणीभंडारा व गोंदिया जिल्ह्यात शिवसेनेची गावागावांत बांधणी आहे. शेकडो शिवसैनिक आहेत. भंडाराचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र भोंडेकर अनुभवी आहेत. त्यांनी भंडाराचे आमदार म्हणून नेतृत्व केले आहेत. शिवसेनेची सध्या चांगली पकड मतदार संघात असताना त्यांना नेमके बाजुला का सारले जात आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.शिवसेना - भाजपात समन्वयाचा अभावलोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसत आहे. त्यामुळे प्रचारात भाजपा-सेनेचे ‘एकला चलो रे’ अशी भुमिका दिसत आहे. याऊलट काँग्रेस आणि राष्टÑवादीत चांगला समन्वय आहे. दोन्ही पक्षाचे नेते एकदिलाने प्रचाराचा कामाला लागले आहेत.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक