शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; शेतकऱ्यांच्या मुलांना लावारीस म्हणणारे शेतकरी हितैशी कसे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 22:14 IST

भाजप सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक विकास झाला, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन भाजप सरकार स्वत:ला शेतकरी हितेशी असल्याचे सांगत आहे. तर दुसरीकडे भाजपचे प्रवक्ते शेतकऱ्यांच्या मुलांना लावारीस म्हणत आहे.

ठळक मुद्देवर्षा पटेल : तुमसर तालुक्यात ठिकठिकाणी प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भाजप सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक विकास झाला, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन भाजप सरकार स्वत:ला शेतकरी हितेशी असल्याचे सांगत आहे. तर दुसरीकडे भाजपचे प्रवक्ते शेतकऱ्यांच्या मुलांना लावारीस म्हणत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना लावारीस म्हणणारे भाजप सरकार शेतकरी हितैशी कसे? हे जनतेच ठरवावे, तसेच अशा नौटंकीबाज सरकारला धडा शिकवावा, असे प्रतिपादन वर्षा पटेल यांनी केले.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीचे अधिकृत उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या निवडणूक प्रचारार्थ शनिवारी (दि.६) तुमसर तालुक्यातील आष्टी, चिखला, येरली, माडगी येथे आयोजित प्रचारला सभेला संबोधित करताना त्या बोलत होत्या. वर्षा पटेल म्हणाल्या, भाजप सरकारचे नेते जुमेलबाजी करण्यात ऐवढे पुढे गेले आहेत की त्यांना त्यांच्या जेष्ठ नेत्यांचा सुध्दा विसर पडला आहे. भाजप नेते ७० वर्षे काँग्रेसने देशाची लूट केल्याचा आरोप करीत. मात्र या कालावधीत तीन वेळा अटल बिहारी वाजपेयी हे सुध्दा पंतप्रधान असल्याचा त्यांना विसर पडला आहे. भाजप नेत्यांनाच त्यांच्या आदरणीय नेत्यांचा विसर पडत आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर मागील पाच वर्षांत गोंदिया भंडारा जिल्ह्याचा विकास पूर्णपणे खुंटला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या विमानात बसून गोंदिया येथे आले ते विमानतळ सुध्दा आघाडी सरकारच्या कार्यकाळात खा. प्रफुल्ल पटेल यांनी तयार केले. तर मोदी सरकारने गोसीखुर्द प्रकल्पाचा निधी रोखला, भेल सारखा महत्त्वपूर्ण प्रकल्प रद्द करुन या दोन्ही जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार मिळण्यापासून वंचित ठेवण्याचे काम केले. त्यामुळे अशा जुमलेबाज भाजप सरकारचा खरा चेहरा जनतेपुढे आला असून जनताच या निवडणुकीत त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार आहे. गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या सर्वांगिन विकासासाठी महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुध्दे यांना साथ देण्याचे आवाहन केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhandara-gondiya-pcभंडारा-गोंदियाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019