शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
3
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
4
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
5
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
6
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
7
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
8
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
9
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
10
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
11
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
12
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
13
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
14
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
15
‘एनडीए’चे २३७ उमेदवार जाहीर; प्रचाराला चढला रंग
16
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी

Lok Sabha Election 2019; निवडणुकीची कामे यंत्रणांनी संवेदनशीलपणे करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 22:18 IST

भंडारा-गोंदिया लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने जिल्हा निवडणूक विभागाने चांगली तयारी केली आहे. भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात ही निवडणूक पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणांनी संवेदनशीलपणे कामे करावीत, असे प्रतिपादन भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक डॉ.पार्थ सारथी मिश्रा यांनी केले.

ठळक मुद्देपार्थ सारथी मिश्रा : नोडल अधिकाऱ्यांची सभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने जिल्हा निवडणूक विभागाने चांगली तयारी केली आहे. भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात ही निवडणूक पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणांनी संवेदनशीलपणे कामे करावीत, असे प्रतिपादन भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक डॉ.पार्थ सारथी मिश्रा यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात नोडल अधिकाऱ्यांच्या सभेत गुरूवारी (दि.४) उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक विनीता साहू, स्वीपचे नोडल अधिकारी डॉ.राजा दयानिधी प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. मिश्रा यांनी, ११ एप्रिल हा मतदानाचा दिवस असल्यामुळे तो राष्ट्रीय उत्सव आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठी विविध यंत्रणांच्या माध्यमातून निवडणुकीची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडायची आहे. निवडणुकीसाठी कामे करताना यंत्रणेतील सर्वांनी स्वत:ला झोकून देवून काम करावे. ही कामे करतांना कोणाच्या हातून चूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. निवडणुकीच्या काळातील प्रशिक्षण ते मतमोजणी या दरम्यानच्या कालावधीत अत्यंत सुक्ष्म नियोजनातून आपापली जबाबदारी पार पाडावी. प्रसार माध्यमे या काळात अत्यंत सक्रीय असतात. जर काही चूक झाली तर ती चूक ते लक्षात आणून देतात. पण चूक होणारच नाही याची दक्षता निवडणुकीच्या काळात प्रत्येकाने घेवून काम करावे. जिल्ह्यात अवैध दारुची वाहतूक होणार नाही यासाठी उत्पादन शुल्क विभागाने दक्ष राहून काम करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.निवडणूक ही सामुहिक जबाबदारी असल्याचे सांगून डॉ.मिश्रा यांनी, या काळात आदर्श आचारसंहितेचे पालन करणे हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. निवडणुकीच्या काळात निवडणूक यंत्रणेत काम करणाºया अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राजकीय बाबींवर बोलू नये.जिल्ह्यात निवडणुका शांततेत पार पाडण्याची परंपरा यापुढेही कायम राहावी. निवडणूक यंत्रणेत काम करणाºया प्रत्येकाने निवडणुकीच्या अटी व नियमांचे वाचन करुन पालन केले पाहिजे. जिल्ह्यात नवीन मतदार, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार यांच्यासह सर्व मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले पाहिजे. निवडणूक यंत्रणेतील सर्वांनी कठोर परिश्रम घेवून ही निवडणूक यशस्वी करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांनी, जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघ क्षेत्रात येणाºया विधानसभा मतदारसंघांची तसेच मतदार नोंदणीसाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. सन २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीत झालेल्या मतदानाची माहिती देखील त्यांनी दिली. या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जिल्ह्यात ९ सखी मतदान केंद्र राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. मतदान केंद्रावर देण्यात येणाऱ्या सुविधा, उपलब्ध असलेल्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची माहिती तसेच निवडणुकीसाठी लागणारे मनुष्यबळ, वाहतूक व्यवस्था याबाबतची माहिती त्यांनी दिली.डॉ.दयानिधी यांनी, मतदार जागृती अभियानांतर्गत विविध उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात आल्याचे सांगितले. दिव्यांग मतदारांसाठी विशेष जनजागृती मोहिम राबविण्यात आल्याचे सांगून डॉ.दयानिधी यांनी दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअर व रॅम्सच्या व्यवस्थेसह अन्य सुविधा मतदान केंद्रावर दिव्यांगांना देणार असल्याचे सांगितले.सभेला अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, पोलीस उपअधीक्षक (गृह) सोनाली कदम, नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी राहूल खांडेभराड, उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, कोषागार अधिकारी विजय जवंजाळ, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा प्रशासन अधिकारी विनोद जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राठोड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पंकज गजभिये, जिल्हा खनिकर्म अधिकारी राजविलास गजभिये, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक तांबे उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhandara-gondiya-pcभंडारा-गोंदियाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019