शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची शहरात प्रचार रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 13:08 IST

भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीचे अधिकृत उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या निवडणूक प्रचारार्थ मंगळवारी (दि.२) शहरातील प्रभाग क्रमांक ११,१२ व ३ आणि ४ मध्ये माजी आ. राजेंद्र जैन, प्रफुल अग्रवाल, अशोक गुप्ता व नगरसेवकांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीचे अधिकृत उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या निवडणूक प्रचारार्थ मंगळवारी (दि.२) शहरातील प्रभाग क्रमांक ११,१२ व ३ आणि ४ मध्ये माजी आ. राजेंद्र जैन, प्रफुल अग्रवाल, अशोक गुप्ता व नगरसेवकांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली.रॅलीला संबोधित करताना राजेंद्र जैन यांनी भाजप सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरले आहे. सरकारच्या जनहित विरोधी धोरणामुळे जनतेमध्ये तिव्र नाराजी आहे. विकासाचे आश्वासन देत सत्तेवर आलेले भाजप सरकार आता विविध विकासात्मक योजनांच्या निधीत कपात करीत आहे.भंडारा-गोंदिया जिल्ह्यात मागील पाच वर्षांत केंद्र व राज्य सरकारने एकही विकासात्मक काम केले नाही. परिणामी जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. त्यामुळे येत्या ११ तारखेला सजग राहून विकास विरोधी सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन केले. आघाडीचे उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहून या क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यास सांगितले. रॅलीत नरेश माहेश्वरी, अशोक चौधरी, देवेंद्रनाथ चौबे, सतीश देशमुख, नानु मुदलियार, जयंत कछवाह, दीपकभाई पटेल, विनायक खैरे, मयुर दरबार, चिकू अग्रवाल, खलील पठान, जग्गु वासनिक, संदीप पटले, रमन उके, नाजूक शेंडे, त्रिलोक तुरकर आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकgonda-pcगोंडाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019