शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
2
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
3
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
4
IND vs AUS : कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच कोच गंभीर यांना भेटला अन्.... (VIDEO)
5
विराट कोहलीने क्रिकेटप्रेमीला पाकिस्तानी जर्सीवर दिली स्वाक्षरी, व्हिडीओ व्हायरल, अखेर समोर आली अशी माहिती
6
१८ कोटी घरातील माणसांच्या खात्यात वळवली; प्रशांत हिरेंसह कुटुंबीयांवर गुन्हा
7
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त जिल्ह्यांना १३५६ कोटींची मदत; राज्य सरकारचा शासन निर्णय
8
VIDEO: महिला जीपमागे लपून काढत होती फोटो, अचानक मागून आला चित्ता अन् मग जे झालं...
9
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला 'या' शुभ मुहूर्तावर मंत्रांनी करा धन्वंतरीसह लक्ष्मी-कुबेराची विधिवत पूजा!
10
125cc Bikes: होंडा शाईन vs बजाज पल्सर; किंमत आणि फीचर्सबाबतीत कोणती चांगली?
11
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला मोठा धक्का, रशियन राजदूताने लाईव्ह अपमान केला
12
३ वर्षांत ३९% पर्यंत परतावा! 'या' म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना केले मालामाल; कोणते आहेत फंड?
13
“PM मोदी अन् नितीश कुमारांची जादू, बिहारमध्ये NDAचाच विजय होणार”; CM फडणवीसांना विश्वास
14
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status च्या माध्यमातून देऊन आनंदात साजरा करा दीपावलीचा सण!
15
“गणेश नाईक कसलेले पैलवान, अंतिम तेच विजयी होतील, शिंदे हे...”; संजय राऊतांचा मोठा दावा
16
AUS vs IND ODI Series Launch Event: 'जानी दुश्मन'सोबत गप्पा मारल्या; मग ते फोटो काढायला गेले, पण... (VIDEO)
17
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला का आणि कसे करावे यमदीपदान? अकाली मृत्यू खरंच टळतो का?
18
पराभवाच्या भीतीमुळे निवडणुका पुढे ढकलण्याचा उद्धव ठाकरेंचा डाव; भाजपाची बोचरी टीका
19
जरांगे चक्क CM फडणवीसांच्या बाजूने बोलले; म्हणाले, “काही लोक अडचणीत आणतात, पण आमचा विश्वास”
20
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला 'या' वस्तूंची खरेदी करेल मोठे नुकसान; ऐन दिवाळीत होईल पश्चात्ताप!

Lok Sabha Election 2019; शेतकऱ्यांची सोडून उद्योगपतींची कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 23:03 IST

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोठ मोठी स्वप्न दाखविले. मात्र आज तेच मोदी पूर्णपणे बदलले असून ‘अच्छे दिन’च्या गोष्टीही ते करीत नाही. मागील वर्षांत वॅटच्या माध्यमातून सरकारला आठ लाख कोटींचा महसूल मिळत होता. आता मात्र यावर्षी जीएसटीमुळे १२ लाख कोटी रूपये सरकारला मिळाले असून ते सर्वसामान्यांच्या खिशातून काढलेले आहेत.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : महाआघाडीच्या शहर व ग्रामीण भागातील प्रचार सभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोठ मोठी स्वप्न दाखविले. मात्र आज तेच मोदी पूर्णपणे बदलले असून ‘अच्छे दिन’च्या गोष्टीही ते करीत नाही. मागील वर्षांत वॅटच्या माध्यमातून सरकारला आठ लाख कोटींचा महसूल मिळत होता. आता मात्र यावर्षी जीएसटीमुळे १२ लाख कोटी रूपये सरकारला मिळाले असून ते सर्वसामान्यांच्या खिशातून काढलेले आहेत. या रकमेचा लाभ देशातील जनतेला मिळाला नाही. सरकारने या पैशांतून शेतकऱ्यांची नव्हे तर चार उद्योगपतींची चार लाख कोटींची कर्जमाफी केल्याची टीका आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केली.राष्ट्रवादी कॉँग्रेस-कॉँग्रेस-आरपिआय, पिरिपा, खोरिपा महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या प्रचारार्थ गोंदिया शहरासह ग्रामीण भागात आयोजित प्रचार सभांना संबोधित करताना ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, सन २००९ मध्ये सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात कॉँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली होती. मात्र भाजप सरकारची शेतकºयांप्रती कशाप्रकारचीही जबाबदारी व आत्मीयता नाही. यामुळेच आजही शेतकरी कर्जमाफीसाठी बँकांच्या चकरा मारत आहेत. प्रत्येकालाच या सरकारने कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्रासवून सोडले असल्याचा आरोपही केला.याप्रसंगी जिल्हा परिषद सभापती सीमा मडावी, प्रकाश रहमतकर, रमेश अंबुले, विमल नागपुरे, विजय लोणारे, विठोबा लिल्हारे, माधुरी हरिणखेडे, चमन बिसेन, ओमप्रकाश भक्तवर्ती, स्नेहा गौतम, प्रमिल करचाल, निता पटले, विनिता टेंभरे यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhandara-gondiya-pcभंडारा-गोंदियाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019