शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; परप्रांतातील ३०० वाहने सभेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 13:09 IST

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गोंदियात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला उपस्थिती दर्शविण्यासाठी छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्यातील ३०० वाहने दाखल झाली आहेत. छत्तीसगड येथील वाहने आमगाव मार्गाने होत पतंगा मैदानावरुन बायपास रस्त्याने सभा स्थळी गेली.

ठळक मुद्देमध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील नागरिक : वेगवेगळ्या ठिकाणी वाहनांसाठी पार्किंग

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गोंदियात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला उपस्थिती दर्शविण्यासाठी छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्यातील ३०० वाहने दाखल झाली आहेत. छत्तीसगड येथील वाहने आमगाव मार्गाने होत पतंगा मैदानावरुन बायपास रस्त्याने सभा स्थळी गेली. सभा स्थळापासून सुमारे १ किलोमीटर अंतरावरच त्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती.मध्यप्रदेश राज्यातून आलेल्या वाहनांना बालाघाट रस्त्यावर ठिकठिकाणी उभे करण्यात आले होते. मोदींच्या प्रचार सभेसाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी-कार्यकर्ते व नागरिक वाहनांनी आले होते. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना मोदींच्या प्रचार सभेसाठी वाहनांनी आणण्यात आले होते.या सभेसाठी सुमारे २ ते ३ हजार चारचाकी वाहनांची गर्दी गोंदियात झाली होती. प्रचार सभेसाठी येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था योग्य पद्धतीने न करण्यात आल्यामुळे पतंगा मैदानापासून तर बालाघाट रस्त्यापर्यंत विविध ठिकाणी चारचाकी व दुचाकी वाहनांची पार्किंग अस्ताव्यस्त होती.रस्त्यांवर गर्दी होऊ नये याकरिता शहरातील वाहनांसाठी जिल्हा क्रीडा संकुल व मरारटोली येथील सामाजिक न्याय भवनाच्या बाजूला असलेल्या पटांगणात पार्कींगची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु क्रिडा संकुलात बोटावर मोजण्या इतकीच वाहने असताना बायपास रस्त्याच्या कडेलाच जागा मिळेल तेथे वाहने ठेवण्यात आली होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकgonda-pcगोंडाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019