शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; १० हजार ५०० अधिकारी-कर्मचारी झाले सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 22:20 IST

देशाच्या महाऊत्सवाची अर्थात लोकसभेच्या निवडणुकीची प्रशासकीय पातळीवर सज्जता झाली असून आतापर्यंत दोन प्रशिक्षण पूर्ण झाले आहेत. १० हजार ५०० अधिकारी-कर्मचारी निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. तिसरे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर १० एप्रिल रोजी पोलिंग पार्टी आपल्या निर्धारित मतदान केंद्रावर पोहचणार आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीसाठी दोन प्रशिक्षण पूर्ण : १० एप्रिलला होणार पोलिंग पार्टी रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देशाच्या महाऊत्सवाची अर्थात लोकसभेच्या निवडणुकीची प्रशासकीय पातळीवर सज्जता झाली असून आतापर्यंत दोन प्रशिक्षण पूर्ण झाले आहेत. १० हजार ५०० अधिकारी-कर्मचारी निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. तिसरे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर १० एप्रिल रोजी पोलिंग पार्टी आपल्या निर्धारित मतदान केंद्रावर पोहचणार आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात तुमसर, भंडारा, साकोली, अर्जुनी मोरगाव, तिरोडा आणि गोंदिया या सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. या सहाही क्षेत्रात अधिकारी कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.निवडणुकीचे कामकाज कसे करावे, आयोगाच्या सूचना, मतदानाची तयारी, ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची माहिती आदिंवर प्रशिक्षण देण्यात आले.यावेळी निवडणुकीत व्हीव्ही पॅट यंत्राचा वापर होणार आहे. ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट यंत्राचे प्रशिक्षण सुद्धा देण्यात आले आहे. यासोबतच पोलीस पार्टी, एसएसपी, एफएसपी, निवडणूक खर्च तीन, विविध नोडल अधिकारी यांनाही प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणूक कार्यात सुसुत्रता व अचूकता घेण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक असून निवडणूक विभागाच्या वतीने संबंधितांना आवश्यक ते प्रशिक्षण दिले आहे.सदर प्रशिक्षण निवडणूक निर्णय अधिकारी शांतनू गोयल यांच्या मार्गदर्शनात भंडाराचे सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ, तुमसरचे मुकुंद टोणगावकर, साकोलीच्या मनिषा दांडगे, अर्जुनी मोरगावच्या शिल्पा सोनाले, तिरोडाचे व्ही. एम. तळपदे आणि गोंदिया येथील ए.एल. वालस्कर यांनी पूर्ण केले.वंचित न राहो कुणी मतदारलोकसभा निवडणुकीत एकही मतदार निवडणुकीपासून वंचित राहू नये यासाठी मतदार जनजागृतीवर भर दिला जात आहे. ‘वंचित न राहो कोणी मतदार’ हे ब्रिद घेऊन विविध माध्यमातून जनजागृती केली जात आहे. यात शाळा, महाविद्यालय, जिल्हा सत्र न्यायालय, विविध शासकीय कार्यालय, ग्रामपंचायत आदी ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आली आहेत. कलापथक, पोस्टर्स, बॅनर्स, जिंगल्स, होर्डींग आदीच्या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढविण्याचा प्रयत्न सुरु आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही जनजागृती केली जात आहे.

 

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019gonda-pcगोंडा