शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

आमगावात लोधी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा

By admin | Updated: April 28, 2017 01:54 IST

येथील साई मंगलम लॉनमध्ये लोधी राजपूत समाजाचा सामूहिक आदर्श विवाह सोहळा पार पडला.

पाच जोडप्यांचे शुभमंगल : काँग्रेसच्या नेत्या साधना भारतीही विवाहबद्ध आमगाव : येथील साई मंगलम लॉनमध्ये लोधी राजपूत समाजाचा सामूहिक आदर्श विवाह सोहळा पार पडला. यामध्ये पाच वर-वधूसोबत मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्याच्या खैरलांजी तालुक्यातील वर लोधी पवन बहेटवारसोबत काँग्रेसच्या राष्ट्रीय स्टार प्रचारक लोधी साधना भारती यांचा विवाह पार पडला. लहानपणापासून सामाजिक कार्यकर्त्याची भूमिका, सोबत आंतराष्ट्रीय सर्वधर्म अनुयायी लोधी, लोधा, लोध राजपूत एकता मिशनच्या मुख्य संयोजिक आणि समारंभाचे मुख्य अतिथी म्हणूनही साधना भारती उपस्थित होत्या. याप्रसंगी त्या म्हणाल्या, पूत सपूत को क्यो धन संचय, पूत कपूत तो क्यो धन संचय. सोबत भारतीय समाजाला हुंडा प्रथेपासून मुक्त करण्याचा संकल्प करावा लागेल. हुंडा प्रथा, कन्या भु्रण हत्या व अकारण खर्चाला समाप्त करुन सामूहिक आदर्श विवाह समारंभामध्ये सर्वांनी आपल्या मुला-मुलींचे व बहीण-भावांचे विवाह करावे, असे आवाहन त्यांनी केले. फक्त अडीच वर्षे वयापासून मागील २१ वर्षात सामाजिक, आध्यात्मिक आणि राजकीय मंचावर हजारो जनसभा व रॅलींना संबोधित करणाऱ्या जगातील सर्वात कमी वयाची साधना भारती आहेत. त्या म्हणाल्या, कन्या भु्रण हत्या व हुंडा या कुप्रथांपासून भारतीय समाजाला मुक्त करण्याकरिता केंद्र सरकारने सकारात्मक विचार करुन सामूहिक विवाह समारंभामध्ये विवाह करणाऱ्या युवक-युवतींना सरकारी नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याची तरतूद संसदमध्ये पारित करावे. तेव्हाच खऱ्या अर्थाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदीद्वारे चालविण्यात येणारी ‘मुली वाचवा, मुली शिकवा’ ही मोहीम सार्थक होईल. मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, राजस्थान आणि उत्तरप्रदेश यासह कित्येक राज्यातील राज्य सरकार सामूहिक विवाह समारंभांना प्रोत्साहन देण्यासाठी निधी देतात. हे हुंडा प्रथेच्या निर्मूलनासाठी सार्थक नाही. सामूहिक विवाह समारंभात लग्न करणाऱ्या मुला-मुलींना पैसा देण्याऐवजी राज्य सरकारने शिक्षणाच्या आधारावर त्यांना सरकारी नोकरी देण्यासाठी पुढाकार घ्यावा. देशाचे उद्योगपती आणि तानाशाह यांनी आपल्या फॅक्ट्री, कारखान्यांमध्ये सर्वात अगोदर योग्यतेच्या आधारावर नोकरी द्यावी, असे त्या म्हणाल्या. विवाह सोहळ्यात खा. अशोक नेते, सामाजिक न्यायामंत्री राजकुमार बडोले, राजस्थानचे शिवराजसिंह लोधी, उद्योगपती गणपतसिंह पटेल मसकरे, सहषराम कोरोटे, माजी जि.प. अध्यक्ष रजनी नागपुरे, आ. गोपालदास अग्रवाल, आ. संजय पुराम, गिरीधर बघेल, माजी आ. भेरसिंह नागपुरे, आंधप्रदेशचे हुकुमसिंह देशराजन, उत्तरप्रदेशचे हरिशसिंह नसरररिया, हीना कावरे, भागवत नागपुरे, ओडीसाचे आयुक्त एम.बी.एस. राजपूत, वित्त विभागाचे उपायुक्त अमरपालसिंह, इंजि. भुमेश लोधी, इंजि. राजू ठकरेले, राष्ट्रीय उपाध्यक्ष शिव नागपुरे, प्रदेश अध्यक्ष ईश्वर उमरे, कमलेश्वर वर्मा, रजमान लोधी, गुनाराम लिल्हारे, चित्रलेखा वर्मा, कुंदन कटारे, विमल नागपुरे, छाया दसरे, हेमलता पतेह, आशिष नागपुरे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक जागेश्वर लिल्हारे यांनी मांडले. संचालन मनिषा लिल्हारे, डी.के. बनोटे, सरला दमाहे यांनी केले. आभार देवेंद्र मच्छिरके यांनी मानले. कार्यक्रमासाठी रोशन लिल्हारे, रोशन गराडे, युनाज बसोने, केवलचंद मच्छिरके, ओंकार लिल्हारे, शंकर नागपुरे, सेवक बनोटे, प्रेमचंद दशरिया, नरेंद्र लिल्हारे, गोविंद लिल्हारे, रोषलाल लिल्हारे, संतोष नागपुरे, लक्ष्मण नागपुरे, रामचंद लिल्हारे, कृष्णकुमार गयैगयै, नूतन दमाहे, सुखवंता ग्यानीराम बनोटे, पुष्पा दिलीप ढेकवार, दीपिका मच्छिरके, प्रीती लिल्हारे, दुर्गेश्वरी दमाहे, बद्रीप्रसाद दशरिया, नेतराम मच्छिरके, भोजराज दमाहे, देवेंद्र मचिया, निरज नागपुरे, राजकुमार नागपुरे आदिंनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)