शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कालीमाटीच्या हायस्कूलला ठोकणार कुलूप

By admin | Updated: September 14, 2016 00:17 IST

तालुक्यातील कालीमाटी येथील विद्या प्रसारण हायस्कूलचे अतिरिक्त ठरविण्यात आलेले शिक्षक डी.एच. रहांगडाले यांना अतिरिक्त न ठरवता

गोरेगाव : तालुक्यातील कालीमाटी येथील विद्या प्रसारण हायस्कूलचे अतिरिक्त ठरविण्यात आलेले शिक्षक डी.एच. रहांगडाले यांना अतिरिक्त न ठरवता त्याच हायस्कूलमध्ये ठेवण्यात यावे, यावरुन पालक-शिक्षक समिती, गावकरी हे १४ सप्टेंबरला शाळेला कुलूप ठोकतील, असा इशारा दिला आहे. याची तक्रार गोरेगाव पोलीस स्टेशन, शिक्षणाधिकारी, सभापती शिक्षण व आरोग्य जि.प. गोंदिया यांना दिल्याची माहिती सरपंच शिवकुमार रहांगडाले यांनी दिली. दिलेल्या माहितीनुसार, विद्या प्रसारण हायस्कूल येथे वर्ग ८ ते १० वी पर्यंत वर्ग असून २६४ पर्यंत पटसंख्या आहे. ६ वर्गातून त्यांना शिक्षण देण्यात येत आहे. शासनाच्या धोरणानुसार ३ वर्गावर १ शिक्षक याप्रमाणे गणित व विज्ञान या विषयासाठी २ शिक्षक कार्यरत होते. पण ९ सप्टेंबरला डी.एच. रहांगडाले यांना अतिरिक्त ठरवून चुटीया या शाळेत हलविण्यात आले. यामुळे ६ वर्गाकरिता एकच शिक्षक गणित व विज्ञान हे विषय शिकवत असल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यांचा शैक्षणिक दर्जा खालावत आहे. यामुळे सरपंच शिवकुमार रहांगडाले, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अरविंद येवलकर, मंजुबाई बोपचे व २७ गावकऱ्यांनी कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे. मात्र ही बदली नियमानुसार असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.