शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाच्या मागणीसाठी शाळेला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 21:47 IST

तालुक्यातील बबई केंद्रातंर्गत येणाऱ्या कवडीटोला येथील जि.प.प्राथमिक शाळेत शिक्षकाचे पद बऱ्याच महिन्यापासून रिक्त आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते होते. शिक्षकाचे पद भरण्याची मागणी वांरवार करुन सुध्दा पद भरण्यात न आल्याने संतप्त पालक व शालेय व्यवस्थापन समितीने मंगळवारी (दि.२६) शाळेला कुलूप ठोकले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांची पंचायतवर धडक : शिक्षकाची नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तालुक्यातील बबई केंद्रातंर्गत येणाऱ्या कवडीटोला येथील जि.प.प्राथमिक शाळेत शिक्षकाचे पद बऱ्याच महिन्यापासून रिक्त आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते होते. शिक्षकाचे पद भरण्याची मागणी वांरवार करुन सुध्दा पद भरण्यात न आल्याने संतप्त पालक व शालेय व्यवस्थापन समितीने मंगळवारी (दि.२६) शाळेला कुलूप ठोकले. त्यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी गोरेगाव पंचायत समिती गाठून तिथे शिक्षकाच्या मागणीसाठी ठाण मांडले होते. अखेर पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप चौधरी यांनी मध्यस्थी केल्यानंतर कवडीेटोला शाळेत शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली.प्राप्त माहितीनुसार कवडीटोला जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथीपर्यंत वर्ग असून एकूण ३५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.एकाच शिक्षिकेच्या भरोश्यावर शाळा सुरू आहे. त्यामुळे या शाळेला दोन शिक्षक देण्याची मागणी विद्यार्थी, शालेय व्यवस्थापन समिती, पालकांनी गटशिक्षणाधिकारी यांना केली होती. पण शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे पालक व शालेय व्यवस्थापन समितीने मंगळवारी (दि.२६) शाळेला कुलूप ठोकले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी थेट पंचायत समितीचे कार्यालय गाठून त्या ठिकाणी ठाण मांडले. शिक्षकाची नियुक्ती केल्याशिवाय या ठिकाणाहून हटणार नाही अशी भूमिका घेतली. दरम्यान माजी सभापती दिलीप चौधरी यांनी मध्यस्थी करुन शिक्षण विस्तार अधिकारी भेंडारकर यांनी सहायक शिक्षक पी.टी.परशुरामकर यांना कवडीटोला शाळेत रु जू होण्याचे आदेश दिले. परशुरामकर यांनी होकार देताच या चिमुकल्यांची मागणी पूर्ण झाली. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले व शाळा पूर्ववत सुरू झाली.