शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

५०० ग्रामपंचायतींना ठोकले कुलूप

By admin | Updated: July 2, 2014 23:20 IST

सध्या सर्वत्र आंदोलनांचे सत्र सुरू असताना ग्रामसेवकांनीही कामबंद आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. राज्यस्तरीय आंदोलनांतर्गत ग्रामसेवकांनी जिल्ह्यातील सुमारे ५०० ग्रामपंचायतींना बुधवारी कुलूप ठोकले.

ग्रामसेवकांचे आंदोलन : काम बंद ठेवून कक्ष अधिकाऱ्यांना दिल्या किल्ल्यागोंदिया : सध्या सर्वत्र आंदोलनांचे सत्र सुरू असताना ग्रामसेवकांनीही कामबंद आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. राज्यस्तरीय आंदोलनांतर्गत ग्रामसेवकांनी जिल्ह्यातील सुमारे ५०० ग्रामपंचायतींना बुधवारी कुलूप ठोकले. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकाऱ्यांना दिले असून ग्रामपंचायतच्या चाब्या कक्ष अधिकाऱ्यांना सुपूर्द केल्या आहेत.ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची वेतन त्रुटी दूर करणे, ग्रामपंचायत स्तरावर नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणे, कंत्राटी ग्रामसेवक ाचा सेवाकाळ कंत्राटी शिक्षकाप्रमाणे सेवेत लागलेल्या तारखेपासून धरणे, २० ग्राम पंचायतीमागे एक विस्तार अधिकार पद निर्माण करणे, प्रवास भत्ता पगारासोबत तीन हजार रूपये लागू करणे, सर्व संवर्गाकरिता बदलीचे धोरण एक ठेवणे, शासनाच्या चुकीमुळे कंत्राटी ग्रामसेवकांना वेळेवर आदेश न मिळाल्यामुळे पेंशन योजनेचा लाभ देण्याबाबत सहानुभुतीपूर्वक निर्णय घेणे आदी मागण्यांसाठी ग्रामसेवकांनी राज्यस्तरीय कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनांतर्गत ग्रामसेवकांनी १ जुलै रोजी कार्यालयीन काम आटोपून कार्यालयाला कुलूप ठोकले. या आंदोलनात जिल्ह्यातील सुमारे ३१० ग्रामसेवक सहभागी असून त्यांनी सुमारे ५१० ग्रामपंचायत कार्यालयांना कुलूप ठोकले. तालुकास्तरावर ८४ ग्रामपंचायतींना कुलूप ठोकण्यात आले. सध्या ग्रामसेवक पंचायत समितीत धरणे आंदोलनावर बसले असून येत्या ११ जुलै रोजी नागपूर विभागातील ग्रामसेवक मुंबई येथे धरणे आंदोलनावर बसणार असल्याची माहिती संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश रूद्रकार यांनी दिली.अर्जुनी/मोरगाव - महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्या वतीने २ जुलैपासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले. बुधवारला तालुक्यातील ग्रामसेवकांनी पंचायत समिती कार्यालयासमोर बसून आंदोलनाची सुरुवात केली. ग्रामसेवकांनी तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतच्या चाब्या व शिक्के खंडविकास अधिकाऱ्यांना सुपूर्द केले. सडक/अर्जुनी - महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने सडक/अर्जुनी तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतीच्या कंत्राटी ग्रामसेवकांना वगळून इतरांनी चाब्या खंडविकास अधिकारी यांच्याकडे सोपविल्याची माहिती तालुकाध्यक्ष कमलेश बिसेन यांनी दिली. सदर आंदोलनात तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांचा सहभाग असून ३ जुलैपासून मुंबई येथे विभागनिहाय धरणे आंदोलन होणार असल्याची माहिती अध्यक्ष कमलेश बिसेन यांनी दिली. (शहर प्रतिनिधी)