शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

आश्वासनानंतर उघडले शाळेचे कुलूप

By admin | Updated: July 4, 2015 02:12 IST

अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर माहुरकुडा येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेला लावण्यात आलेले कुलूप

अर्जुनी मोरगाव : अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर माहुरकुडा येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेला लावण्यात आलेले कुलूप शुक्रवारी (दि.३) उघडण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून ही शाळा बंद आहे.प्राप्त माहितीनुसार ३० जून रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक पार पडली. १ जुलै रोजी मुख्याध्यापक बी.एन. मेश्राम हे सकाळी ७.३० वाजता शाळेत हजर झाले. त्यांनी फाटक व कार्यालयाचे दार उघडले. शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व गावकऱ्यांनी मुख्याध्यापकांना आज सकाळची शाळा आहे काय? इतर शिक्षक कां आले नाही त्यांची गैरहजेरी लावा असे वक्तव्य केले. त्याचवेळी मुख्याध्यापक आपल्या दुचाकीने निघून गेले. मुख्याध्यापक ऐकत नाही. वारंवार शाळेत अशीच प्रकरणे घडत आहेत म्हणून शाळा व्यवस्थापन समितीने १ जुलै रोजी शाळेला कुलूप ठोकले होते. तेव्हापासून शाळा बंदच होती.शाळा बंद पाडल्याची तक्रार मुख्याध्यापकांनी पोलीस ठाण्यात केली होती. गुरुवारला सायंकाळी शाळा व्यवस्थापन समिती सोबत चर्चा झाल्यानंतर यावर तोडगा काढण्यात आला. एक महिन्याचे आत मुख्याध्यापकांची बदली करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे समजते. यानंतर शाळेत शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिलांकडे चाब्या सुपूर्द करण्यात आल्या. आजपासून (दि.३) शाळा पूर्ववत सुरू झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)