शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

गावकऱ्यांनी ठोकले शाळेला कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 21:29 IST

शाळेत एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून शाळेसाठी कायम शिक्षक देण्यात यावे मागणीला घेऊन गावकºयांनी शाळेला कुलूप ठोकले. ग्राम डुंडा येथे शनिवारी (दि.१५) हा प्रकार घडला असून सोमवारीही (दि.१७) शाळा बंदच होती.

ठळक मुद्देडुंडा येथील प्रकार : कायम शिक्षक देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरी : शाळेत एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून शाळेसाठी कायम शिक्षक देण्यात यावे मागणीला घेऊन गावकºयांनी शाळेला कुलूप ठोकले. ग्राम डुंडा येथे शनिवारी (दि.१५) हा प्रकार घडला असून सोमवारीही (दि.१७) शाळा बंदच होती.ग्राम डुंडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वर्ग १ ते ४ पर्यंत असून ३९ विद्यार्थी आहेत. शाळेत मुख्याध्यापक के.एम.मेश्राम व एक शिक्षक होते. मात्र मुख्याध्यापक मेश्राम आपला मनमर्जी कारभार चालवित असल्याने पालकांनी पंचायत समितीत तक्रार केली होती. खंडविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व उपसभापतींनी शाळेला भेट दिली मुख्याध्यापक मेश्राम दोषी आढळले होते. यावर त्यांना येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत हलविण्यात आले. तर येथील शाळेतील शिक्षक आर.एच.चौधरी यांना डुंडा येथील शाळेत तात्पुरते जाण्याचे आदेश ३० नोव्हेंबर रोजी देण्यात आले.मात्र येथील शाळेतील मुख्याध्यापक गोपीचंद चौधरी त्यांना सोडत नसल्याने मागील १५ दिवसांपासून डुंडा येथील शाळेतील एकच शिक्षकावर पूर्ण शाळेची जबाबदारी आली आहे. अशात ते ३९ विद्यार्थ्यांना एकाच खोलीत बसवून शिकवित आहेत.अशात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून शिक्षकांचीही फसगत होत आहे. यावर शाळेला कायम शिक्षक देण्यात यावे यासाठी पालक व गावकऱ्यांनी शनिवारी (दि.१५) शाळेला कुलूप ठोकले. विशेष म्हणजे, सोमवारीही (दि.१७) शाळा बंद होती.प्रकरणी गटशिक्षणाधिकारी एस.आर.बागडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, ३० नोव्हेंबर रोजी पांढरी शाळेतील मुख्याध्यापकांना पत्र देऊन शिक्षक आर.एस.चौधरी यांना डुंंडा शाळेत जाण्यासाठी सोडावे असे कळविले होते. मात्र त्यांनी शिक्षक चौधरी यांना सोडले नसल्याने डुंडा येथील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. करिता मुख्याध्यापक गोपीचंद चौधरी व शिक्षक चौधरी यांचा पगार कपात करण्यात आल्याचे सांगीतले. तसेच लवकरात लवकर डुंडा शाळेसाठी शिक्षकाची सोय करणार असल्याचे सांगीतले.