शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

११७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 06:00 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतंर्गत पात्र ठरलेल्या शेतकºयांची पहिली यादी सोमवारी जाहीर करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार सोमवारी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावातील गावातील कर्जमुक्तीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची निवड करुन यादी जाहीर करण्यात आली.

ठळक मुद्दे४८ तासात जमा झाली रक्कम : कर्जमुक्ती योजना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत जिल्ह्यातील २९ हजार ५३ शेतकरी पात्र ठरले होते. यापैकी आधार लिंकिंग झालेल्या जिल्ह्यातील ११७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर बुधवारी (दि.२६) कर्जमाफीची ३९ लाख ८ हजार ९३२ रुपयांची रक्कम जमा करण्यात आली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतंर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी सोमवारी जाहीर करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार सोमवारी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावातील गावातील कर्जमुक्तीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची निवड करुन यादी जाहीर करण्यात आली.यात गोंदिया जिल्ह्यातील मुंडीपार आणि कट्टीपार येथील १५६ शेतकऱ्यांचा समावेश होता.या शेतकऱ्यांचे आधारकार्ड लिंक करुन त्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम ४८ तासात जमा करण्यात येणार होती. यात गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया झालेल्या कट्टीपार आणि मुंडीपार येथील एकूण ११७ शेतकºयांच्या बँक खात्यात कर्जमाफीची ३९ लाख ८ हजार ९३२ रुपयांची रक्कम जमा केली.यामुळे ऐवढ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमुक्ती योजनेस जिल्ह्यातील एकूण २९ हजार ५३ शेतकरी पात्र ठरले आहे. यापैकी १९ हजार १११ शेतकºयांचे आधारकार्ड लिंक त्यांच्या बँक खात्याशी जोडण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर १८ हजार ६१३ शेतकऱ्यांचे आधारकार्ड लिंक करुन ते शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे काम सुरू आहे.२८ फेब्रुवारीपर्यंत हे संपूर्ण काम पूर्ण होणार असून त्यानंतर या शेतकºयांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे जिल्हा निबंधक एस.पी.कांबळे यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.दुसरी यादी उद्या जाहीर होणारशासनाने दिलेल्या निर्देशानुसार महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी २८ फेब्रुवारी जाहीर करण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील १८ हजारावर शेतकऱ्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. यादी जाहीर झाल्यानंतर या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे.नियमित कर्जफेड करणाऱ्याना प्रतीक्षामहाविकास आघाडी सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अद्यापही कुठलीही योजना जाहीर केलेली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांबाबत सरकार नेमका काय निर्णय घेते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.जिल्हा बँक आघाडीवरशेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळवून देण्यात आणि यासाठीची प्रक्रिया राबविण्यात गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आघाडीवर आहे. या बँकेने ४८ तासात ११७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा केली.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज