शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

यादी तयार करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2016 00:55 IST

राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण २०११ ची माहिती वापरुन प्रधानमंत्री आवास योजना

प्रधानमंत्री आवास योजना : मंजुरीसाठी मांडणार ग्रामसभेत ठराव अर्जुनी-मोरगाव : राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण २०११ ची माहिती वापरुन प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणसाठी लाभार्थ्यांच्या प्राधान्यक्रम याद्या तयार करण्याचे परिपत्रक ग्रामविकास व जलसंधारण विभागाने १ आॅगस्ट रोजी दिले आहे. त्यानुसार ्रतालुक्यात आवास योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या १३ एप्रिल २०१६ च्या पत्रातील सुचनेनुसार ग्रामपंचायत व संवर्गनिहाय प्राधान्यक्रम यादी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या यादीतील संपूर्ण कुटुंबाची घर निकषाबाबतची तालुकास्तरीय समितीने तात्काळ तपासणी करुन वस्तुस्थितीदर्शक अहवाल अभिप्रायासह १५ दिवसात जिल्हास्तरीय समितीकडे पाठवायचा आहे. संकेतस्थळावर उपलब्ध असलेली संवर्गनिहाय उपलब्ध प्राधान्यक्रम यादी ग्रामसभा आयोजित करण्याच्या तारखेपूर्वी ८ दिवस ग्रामपंचायतच्या सुचनाफलकावर लावावी असे निर्देश देण्यात आले आहेत. ग्रामसभा १५ आॅगस्ट रोजी किंवा त्यादरम्यान आयोजित करावयाची आहे. क्षेत्रीयस्तरावरुन गटविकास अधिकारी, पं.स.प्रतिनिधींंनी उपस्थित राहून ग्रामसभेसाठी मार्गदर्शन व सहाय्य करावयाचे आहे. ग्रामसभेपुढे ठेवण्यात येणारे विषय दर्शविण्यात आले आहेत. यात ग्रामसभेने उपलब्ध प्राधान्यक्रम यादीमधील इतर संवर्गातून अल्पसंख्याक संवर्गातील जैन, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी व मुस्लिम कुटुंबाची यादी वेगळी करुन इतर व अल्पसंख्याक संवर्गाची स्वतंत्र यादी मूळ प्राधान्यक्रम यादीतील प्राधान्यक्रम अबाधित ठेवून तयार करणे, संवर्गनिहाय अनु.जाती, जमाती, अल्पसंख्याक व इतर प्राधान्यक्रम यादीमधून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणसाठी पात्र कुटुंबाची प्राधान्यक्रम यादी तयार करणे, संवर्गनिहाय अ.जा., जमाती, अल्प संख्याक व इतर प्राधान्यक्रम यादी तयार करणे, संवर्गनिहाय अ.जा., जमाती, अल्पसंख्याक व इतर प्राधान्यक्रम यादीमधून अपात्र कुटुंबाची नावे वगळून व त्याची कारणे नमूद करुन संवर्गनिहाय याद्या तयार करणे, ग्रामीण योजनेचा लाभ देण्यासाठी ग्रामसभेने सुचविलेल्या नवीन कुटुंबाची संवर्गनिहाय स्वतंत्र याद्या कारणासहीत तयार करणे आदिंचा समावेश आहे. ग्रामसभेच्या ठरावाद्वारे मंजूर झालेल्या याद्यांना ग्रामसभा झालेल्या तारखेपासून ७ दिवस प्रसिद्धी द्यावयाची आहे. यात बदल, वगळणे आदी हरकती असल्यास यादी प्रसिद्धीची मुदत संपल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करता येईल. यासाठी तालुका व जिल्हास्तर अपील समिती गठित करण्यात आली आहे. तालुकास्तरीय समितीत अध्यक्ष गटविकास अधिकारी, सदस्य सचिव- विस्तार अधिकारी सांख्यीकी, सदस्य- नायब तहसीलदार व शाखा अभियंता यांचा समावेश आहे. यासाठी कामकाज सुरू झाल्याची माहिती गटविकास अधिकारी एन.आर. जमईवार यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)