शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

१९ ऑक्टोबरला कुटुंब प्रमुखांच्या यादीचे होणार वाचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबांसाठी या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी गावनिहाय व तालुकानिहाय लाभार्थ्यांची यादी निश्चित करण्यासाठी गावपातळीवर ग्रामपंचायतस्तरावर सरपंच, तलाठी, ग्रामसेवक व पोलीस पाटील यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व आदिवासी कुटुंबांना खावटी अनुदान योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी सोमवारी (दि.१९) जिल्ह्यात ग्रामपंचायतस्तरावर चावडी वाचन केले जाणार आहे.

ठळक मुद्देआदिवासी कुटुंबांसाठी खावटी अनुदान योजना : ५० टक्के अनुदान रोख स्वरुपात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना साहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजना सन २०२०-२०२१ या एका वर्षासाठी राज्य शासनाने सुरू केली आहे. यात ५० टक्के रोख आणि ५० टक्के वस्तू अनुदान स्वरूपात देण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेचा लाभ देण्यासाठी सोमवारी (दि.१९) यांद्यांचे वाचन केले जाणार आहे.जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबांसाठी या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी गावनिहाय व तालुकानिहाय लाभार्थ्यांची यादी निश्चित करण्यासाठी गावपातळीवर ग्रामपंचायतस्तरावर सरपंच, तलाठी, ग्रामसेवक व पोलीस पाटील यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व आदिवासी कुटुंबांना खावटी अनुदान योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी सोमवारी (दि.१९) जिल्ह्यात ग्रामपंचायतस्तरावर चावडी वाचन केले जाणार आहे.या चावडी वाचनातून गावनिहाय व तालुकानिहाय लाभार्थ्यांची यादी निश्चित केली जाईल. आदिवासी विकास विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणातील कुटुंब प्रमुखाच्या नावाच्या यादीचे वाचन केले जाऊन शासन निर्णयानुसार लाभार्थ्यांची निवड पुढील निकषाच्या आधारावर केली जाणार आहे.ज्या कुटुंबाने मनरेगा या योजनेत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत एक दिवस मजूर म्हणून काम केले असावे. आदिवासी जमातीतील सर्व कुटुंब, पारधी जमातीतील सर्व कुटुंब जिल्हाधिकारी यांच्या सल्ल्याने प्रकल्प अधिकारी देवरी यांनी निश्चित केलेले गरजू आदिवासी कुटुंब, ज्यामध्ये परितक्त्या, घटस्फोटीत महिला, विधवा, भूमिहीन शेतमजूर, दिव्यांग व्यक्ती असलेले कुटुंब,अनाथ मुलांचे संगोपन करणारे कुटुंब, वैयक्तिक वनहक्क प्राप्त झालेले वनहक्कधारक कुटुंब अशा प्रकारच्या कुटुंबांना खावटी अनुदान योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.शासकीय-निमशासकीय नोकरीत असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला त्याप्रमाणे आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या कुटुंबांना लाभ देता येणार नाही. या योजनेचा कुटुंब हा घटक असल्याने कुटुंबातील कुटुंब प्रमुख व्यतिरिक्त इतर कोणत्याही सदस्याला लाभार्थी यादीत समाविष्ट करता येणार नाही.खावटी अनुदान योजना १०० टक्के अनुदानावर असल्याने लाभार्थ्यांनी कोणत्याही स्तरावर कुणाशीही आर्थिक व्यवहार करू नये. या योजनेविषयी कुठलीही शंका असल्यास अथवा मदत हवी असल्यास खावटी अनुदान योजनेअंतर्गत स्थापन केलेल्या ग्रामस्तरीय समितीची मदत घ्यावी असे देवरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी यांनी कळविले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या