शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

एकाच आठवड्यात पाईपलाईन झाली ‘लिक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 22:25 IST

चान्ना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाण्याची तीव्र समस्या भेडसावत होती. त्यामुळे बोअरवेलमधून पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आठवडाभरातच पाईप लाईन लिक झाल्याने हा प्रयत्न फसला.

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : चान्ना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाण्याची तीव्र समस्या भेडसावत होती. त्यामुळे बोअरवेलमधून पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आठवडाभरातच पाईप लाईन लिक झाल्याने हा प्रयत्न फसला.पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या लक्षात घेवून आरोग्य विभागाच्या वतीने लाखो रुपये मिळविण्यासाठी तालुक्यातील २ जि.प. सदस्यांनी शर्तीचे प्रयत्न केले. मोठ्या घाई गर्दीने गावातील अंगणवाडी केंद्राजवळच्या बोअरवेल मधून पाईप लाईनच्या माध्यमातून पीएचसीमधील विहिरीमध्ये पाणी टाकण्याचे युद्धस्तरावर काम करुन पाणी टंचाई दूर करण्याचा प्रयत्न केला गेला. वर्तमानपत्रात बातमी देऊन कामाचा श्रेय लाटण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र पाईप लाईन टाकून एक आठवडा होत नाही तर त्या पाईप लाईनला भगदाड पडून पाण्याचा अपव्यय होणे सुरु झाले. लाखो रुपयांचा निधी येवून एकाच आठवड्यात पाईप लाईन लीक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीच्या अध्यक्ष जि.प. सदस्य कमल पाऊलझगडे, सह अध्यक्ष जि.प. सदस्य किशोर तरोणे आहेत. मागील काही वर्षापासून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांनी वाणवा आहे. एका अस्थायी वैद्यकीय अधिकाºयांच्या भरवशावर प्राथमिक आरोग्य केंद्राचा डोलारा सुरु आहे. मागील काही दिवसांपूर्वी एक वैद्यकीय अधिकारी रूजू झाल्याचे सांगण्यात येत असले तरी मात्र त्यांनी कार्यभार सांभाळत रुग्णांना सेवा देण्याची जबाबदारी स्वीकारली नसल्याचे चित्र आहे.कर्मचाºयांची पूर्तता करण्यास दुय्यम स्थान देवून लाखोंचा निधी मिळविण्यात पदाधिकाºयांनी सरसी घेतली. गावातील अंगणवाडी क्रमांक २ मध्ये असलेल्या बोअरवेलमधून अंदाजे ७०० मीटर पाईप लाईन टाकून प्राथमिक आरोग्य केंद्रातील विहिरीमध्ये पाणी टाकण्याचे काम करुन संबंधित पदाधिकाऱ्यांनी पाणी टंचाई सोडविण्याचा प्रयत्न केला. पाणी पुरवठा होऊन आठवडा होत नाही तोच नव्या पाईप लाईनला भगदाड पडून पाण्याचा अपव्यय होत आहे.बिरसू पुराम यांच्या घरासमोरुन पाईप लाईन गेली आहे. त्याच ठिकाणी ती लीक झाली. विद्युत पुरवठा सुरु केल्यावर सर्व पाणी आतमधील पाईपमधून वर येवून रस्त्यावर पसरल्याचे चित्र दिसत आहे. एवढ्या लवकर पाईप लाईन ‘लिक’ झाली कशी, हा प्रश्न पुढे येत आहे. निधी खर्च करुन विहिरीमध्ये पाणी टाकण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरले. दरम्यान पाईपमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याने पाणी टंचाईच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता आहे.