लोकमत न्यूज नेटवर्कसिरपूरबांध : शेतकरी नेहमीच अडचणीत सापडत आहे. सुरुवातीला कमी पावसामुळे रोवणीची कामे पूर्ण होवू शकली नाही. ज्यांच्याकडे पाण्याचे साधन होते त्यांनी कशी बशी रोवणीची कामे आटोपली. सध्या परिसरात हलके धान पीक कापणीला तयार आहे. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे परतीच्या पावसाने धानपिकांचे मोठेच नुकसान झाले आहे.काही शेतकºयांनी दिवाळी साजरी करण्याकरिता धान कापणीला सुरुवात केली. मात्र परतीच्या पावसाने शेतकºयांच्या धान पिकाला मोठे नुकसान झाले आहे. शेतात गुडघ्याच्या वर पाणी साचल्याने कापणी केलेले धानपीक अंकुरित झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. परतीचा पाऊस धो-धो करीत दोन ते तीन दिवसांपासून परिसरात हजेरी लावत असल्याने शेतकºयांना काहीही उपाययोजना करता येत नाही. शेतकरी फक्त हतबल होवून पाऊस कधी थांबेल, हाच विचार करीत आहे.शासन-प्रशासनाने शेतीचे पंचनामा करुन नुकसान भरपाई शेतकºयांना द्यावी, अशी मागणी होत आहे.परिसरात यावर्षी निसर्ग सुरुवातीपासूनच कोपला असून शेकडो एकर जमीन पडीक आहे. परंतु शासन-प्रशासन निद्रावस्थेत आहे. आता तरी शासन प्रशासनाने जागे होवून संकटात सापडलेल्या शेतकºयांना मदत करावी, अशी मागणी पीडित हवालदिल शेतकरी वर्गाकडून होत आहे.
पावसाने हलक्या धानाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 21:14 IST
शेतकरी नेहमीच अडचणीत सापडत आहे. सुरुवातीला कमी पावसामुळे रोवणीची कामे पूर्ण होवू शकली नाही. ज्यांच्याकडे पाण्याचे साधन होते त्यांनी कशी बशी रोवणीची कामे आटोपली.
पावसाने हलक्या धानाचे नुकसान
ठळक मुद्देशेतकºयांची दिवाळी अंधारात : परतीच्या पावसामुळे शेतकरी हवालदिल