शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

मातीला आकार देणाऱ्यांच्या जीवनाला आधार मिळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:47 IST

सडक-अर्जुनी : उन्हाळ्यात कुंभारबांधव मातीला आकार देऊन नवनवीन भांडी तयार करतो. ही भांडी विकलेल्या पैशातून तो उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी ...

सडक-अर्जुनी : उन्हाळ्यात कुंभारबांधव मातीला आकार देऊन नवनवीन भांडी तयार करतो. ही भांडी विकलेल्या पैशातून तो उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लावत असतो; मात्र यंदा कुंभारबांधवांनी मातीला आकार दिला खरा; पण तयार केलेले माठ खरेदीसाठी लॉकडाऊनमुळे ग्राहक फिरकत नसल्याने त्यांच्यासमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. मातीला आकार देणाऱ्यांच्या जीवनाला आधार मिळत नसल्याचे चित्र आहे.

मागील वर्षीपासून लॉकडाऊनमुळे कुंभार बांधवांवर संकट ओढवले आहे. प्रत्येक व्यक्तीच्या घरी आजही फ्रीज नाही. त्यामुळे वाढत्या तापमानाची काहिली दूर करण्याकरिता थंड पाण्याच्या मातीच्या माठाला मोठी मागणी असते. या दिवसात कुंभाराने तयार केलेल्या माठाची सर्वांना आठवण येते. त्यामुळे घरोघरी थंड पाण्याकरिता माठाचा उपयोग केला जातो. मागील वर्षी व यंदासुद्धा लॉकडाऊनने हा सारा व्यवसायच लॉक झाला आहे. सडक-अर्जुनी शहरात २५ च्या जवळपास कुंभारबांधव आहेत. ते इतर वेळी म्हणजेच कान्होबा, गणपती, शारदा, दुर्गा, लक्ष्मी आदी मूर्ती तयार करतात. तसेच दिवाळीला मातीचे दिवेदेखील तयार करतात. याच व्यवसायातून आलेल्या मिळकतीतून उदरनिर्वाह करतात. वंशपरंपरागत चालत आलेला हा त्यांचा व्यवसाय आहे; परंतु आजघडीला पार कोलमडून गेला आहे. लॉकडाऊनमुळे माठांची खरेदी करण्यासाठी ग्राहक त्यांच्याकडे फिरकत नसल्याचे चित्र आहे. तर त्यांनासुद्धा बाहेरगावी माठ विक्रीसाठी जाता येत नसल्याने त्यांच्या रोजगारावर गदा आली आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. शासनाने कुंभार समाजबांधवांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली जात आहे.

कोट

सध्या व्यवसाय ठप्प झाला आहे. आठवडी बाजार बंद आहे. बाहेरगावी जाता येत नाही आणि बाहेर गावावरून ग्राहक येत नाहीत. चौकात दुकान लावले, तर ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागते. सध्या सकाळी ११ पर्यंतच दुकानांची वेळ आहे. विक्री होत नाही. जीवन कसे जगावे, हाच प्रश्न आहे.

विलास पात्रे, सडक-अर्जुनी.