शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

समग्र शिक्षा अभियानातून फुलतेय २८० दिव्यांगांचे जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 22:35 IST

दिव्यांगाचे जीवन सर्व सामान्य माणसांसारखेच असावे यासाठी त्यांचे जीवन फुलविण्यासाठी समग्र शिक्षा अभियानातर्फे उन्हाळी शिबिराचे आयोजन ५० दिवसासाठी घेण्यात येत आहे. १ मे पासून सुरू झालेले हे शिबिर तब्बल २२ जून पर्यंत घेण्यात येत आहे.

ठळक मुद्दे२८ अंध बालकांना ब्रेलपूर्व वाचन : ९४ विद्यार्थ्यांना किमान कौशल्य प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिव्यांगाचे जीवन सर्व सामान्य माणसांसारखेच असावे यासाठी त्यांचे जीवन फुलविण्यासाठी समग्र शिक्षा अभियानातर्फे उन्हाळी शिबिराचे आयोजन ५० दिवसासाठी घेण्यात येत आहे. १ मे पासून सुरू झालेले हे शिबिर तब्बल २२ जून पर्यंत घेण्यात येत आहे. दिव्यांगाना व्यावसायीक शिक्षण देत २८ अंध मुलांसाठी ब्रेल पूर्व वाचनाचे आयोजन करण्यात आले आहे.या दिव्यांगासाठी विशेष शिक्षीका बोलाविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात पहिल्यांदाच शिवणकाम व पिको फॉल प्रशिक्षण दिले जात आहे.दिव्यांग विद्यार्थ्यांना शाळा पूर्व तयारी, किमान कौशल्य विकास प्रशिक्षण, ब्रेलपूर्व वाचन, शिवणकाम शिकविण्यासाठी तब्बल ५० दिवसासाठी आयोजित या प्रशिक्षणाला जिल्हाभरातील २८० दिव्यांग विद्यार्थ्यांची हजेरी लावली आहे. पहिल्या वर्गात दाखल झालेल्या ८७ दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शाळा पूर्व तयारी केली जात आहे. वर्ग ८ ते १२ वीच्या ९४ दिव्यांगाना किमान कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येत आहे. ७१ कर्णबधीरांना शिवणकाम व पिको फॉलचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ.राजा दयानिधी, शिक्षण सभापती रमेश अंबुले, प्राथमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्या मार्गदर्शनातून या दिव्यांगाच्या उत्थानासाठी जिल्हा परिषदेचा समग्र शिक्षा अभियानाचे समन्वयक विजय ठोकणे काम करीत आहेत. यामुळे दिव्यांगाना आधार मिळत आहे.