शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

आंभोऱ्याजवळ कालवा झाला लिकेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 21:29 IST

शहरातील पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी पुजारीटोला धरणाचे पाणी कालव्याद्वारे डांर्गोली पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविले जात आहे. मात्र सालेकसा तालुक्यातील आंभोरा गावाजवळ कालवा लिक झाल्याने पुजारीटोला धरणाचे गेट गुरूवारी बंद करण्यात आले.

ठळक मुद्देपाणीटंचाईची समस्या तीव्र : शहरवासीयांच्या वाट्याला आठ दिवसांची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी पुजारीटोला धरणाचे पाणी कालव्याद्वारे डांर्गोली पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविले जात आहे. मात्र सालेकसा तालुक्यातील आंभोरा गावाजवळ कालवा लिक झाल्याने पुजारीटोला धरणाचे गेट गुरूवारी बंद करण्यात आले. त्यामुळे शहवासीयांना पुन्हा आठ दिवस पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातंर्गत डांर्गोली येथे वैनगंगा नदीच्या पात्रालगत उभारलेल्या पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. मात्र यावर्षी वैनगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यातच कोरडे पडल्याने त्याचा पाणीपुरवठा योजनेवर परिणाम झाला. मागील महिनाभरापासून शहरवासीयांना केवळ दिवसातून एकच वेळ पाणी पुरवठा केला जातो. मात्र मागील तीन चार दिवसांपासून तो देखील बंद झाला. त्यामुळे शहरात पाणीटंचाईची समस्या गंभीर झाली आहे. पाणी टंचाईच्या समस्येवर उशिरा जागे झालेल्या जिल्हा प्रशासन आणि मजीप्राने पुजारीटोला धरणातून पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला.यासाठी पुजारीटोला धरणाचे पाणी कालव्याव्दारे डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविण्याचे काम सुरू केले. मंगळवारी (दि.१०) पुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्यात आले. मात्र हे पाणी धरणापासून ४० कि.मी.अंतरावर असलेल्या आंभोरा गावाजवळ पोहचल्यानंतर कालवा लिकेज झाल्यामुळे दुसरीकडे वळले. तसेच पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला. त्यामुळे गुरूवारी (दि.१२) पुजारीटोला धरणाचे गेट बंद करुन कालवा दुरूस्तीचे काम सिंचन विभागाने सुरू केले.कालव्याला चांगले मोठे भगदाड पडले असून दुरूस्तीचे काम दोन तीन दिवस चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पाणी पोहचण्यास किमान आठ दहा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. परिणामी शहरवासीयांना पुन्हा आठ ते दहा दिवस पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.सिंचन विभागाकडे बोटआंभोरा गावाजवळ कालवा लिकेज झाल्यानंतर दुरूस्तीची जबाबदारी सिंचन विभागाकडे सोपविण्यात आली. कालव्याची दुरूस्ती किती दिवसात होईल आणि पाणी सोडण्यात येईल अशी विचारणा मजीप्राच्या अधिकाºयांना केली असता त्यांनी सिंचन विभागाकडे बोट दाखविले. तर सिंचन विभागाच्या अभियंत्याला यासंदर्भात विचारले असता त्यांनी यावर बोलणे टाळले. त्यामुळे कालवा लिकेजची समस्या गंभीर असल्याची माहिती आहे.ढिसाळ नियोजनाचा फटकाशहरात यंदा पाणी टंचाई निर्माण होणार ही बाब महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाला चांगलीच ठाऊक होती. मात्र जेव्हा शहराचा पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला तेव्हाच या दोन्ही विभागाने पुजारीटोला धरणातून पाणी आणण्यासाठी धडपड सुरू केली. पुजारीटोला धरण ते डांगोर्ली पाणी पुरवठा योजना हे ९० कि.मी.चे अंतर असून ज्या कालव्याव्दारे हे पाणी आणले जाणार होते त्या कालव्यांची स्थिती योग्य आहे का? याची सुध्दा पाहणी करणे या दोन्ही विभागांना गरजचे वाटले नाही. आंभोरा गावाजवळ कालवा लिक झाल्यानंतर या विभागाला पाहणी करण्याची जाग आली. एकंदरीत या दोन्ही विभागांच्या ढिसाळ नियोजनाचा फटका शहरवासीयांना बसत आहे.मजीप्रा म्हणते शहरात पाणीटंचाई नाहीशहरातील जवळपास सर्वच भागात पाणी पुरवठा होत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. तसेच सकाळच्या सुमारास सार्वजनिक विहिरी आणि बोअरवेलवर पाणी भरण्यासाठी महिलांची गर्दी पाहल्यानंतर शहरातील पाणी टंचाईची तीव्रता जाणविते. मात्र यासंदर्भात मजीप्राचे उपविभागीय अभियंता राजेंद्र मडके यांच्याशी संपर्क साधला असता शहरातील सर्वच भागात सुरळीतपणे पाणी पुरवठा होत असल्याचा दावा केला.