शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

19 कृषी केंद्रांचे परवाने केले निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2022 05:00 IST

खरीप हंगामा दरम्यान शेतकऱ्यांची बोगस बियाणे, खतांच्या नावावर फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाने भरारी पथके व तपासणी माेहीम सुरू केली आहे. मात्र, त्यानंतरही जिल्ह्यात बोगस बियाणे आणि खतांची विक्री केली जात असल्याचा प्रकार देवरी आणि गोंदिया कृषी विभागाने केलेल्या कारवाईनंतर स्पष्ट झाले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्र राज्यात १ नोव्हेंबर २०१७ पासून अनुदानित खते विक्रीसाठी थेट लाभ हस्तांतरण योजना सुरू करण्यात आली आहे. खरीप हंगामात  टॉप-२०  युरिया  बायर खरेदीदार गैरप्रकारासंदर्भात जिल्ह्यातील श्रीनाथ कृषी केंद्र ठाणा (ता. आमगाव), विनायक फर्टिलायजर कामठा (ता. गोंदिया), श्याम कृषी केंद्र एकोडी (ता. गोंदिया) या तीन कृषी केंद्रांचे परवाने तीन महिन्यांकरीता निलंबित केले. सम्यक कृषी केंद्र सोनबिहारी (ता.गोंदिया), जय किसान कृषी केंद्र बनाथर ( ता. गोंदिया), हिंदुस्थान ॲग्री क्लिनिक कुडवा (ता. गोंदिया), अंश कृषी केंद्र चुटिया (ता.गोंदिया), केवलराम कृषी केंद्र चुटिया (ता. गोंदिया), सेंट्रल कृषक सहकारी संस्था कटंगी (ता. गोंदिया), श्री गणेश कृषी केंद्र पांढराबोडी (ता. गोंदिया) या सात कृषी केंद्रांचे परवाने १५ दिवसांकरीता निलंबित करण्यात आले आहे. मालती कृषी केंद्र ब्राह्मणी (ता.सालेकसा), राजेंद्र उपराडे कृषी केंद्र दशरथटोला ब्राह्मणी (ता. सालेकसा), नागपुरे कृषी केंद्र पठानटोला (ता. सालेकसा) या तीन कृषी केंद्राची पुनश्च: सुनावणी २९ जून ,लावून कृषी केंद्रावर कारवाई करण्यात आली. 

भरारी पथकाची नजर तरीही खते बियाण्यांचा काळाबाजार - खरीप हंगामा दरम्यान शेतकऱ्यांची बोगस बियाणे, खतांच्या नावावर फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाने भरारी पथके व तपासणी माेहीम सुरू केली आहे. मात्र, त्यानंतरही जिल्ह्यात बोगस बियाणे आणि खतांची विक्री केली जात असल्याचा प्रकार देवरी आणि गोंदिया कृषी विभागाने केलेल्या कारवाईनंतर स्पष्ट झाले आहे. 

 या सहा कृषी केंंद्रांना दिली सक्तीची ताकीद

- खरीप हंगाम २०२२ मध्ये शेतकऱ्यांना योग्य दर्जाचे बियाणे व रासायनिक खते मिळण्याकरीता जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्री केंद्राची तपासणी करण्याची कार्यवाही जिल्ह्यातील निरीक्षकांमार्फत करण्यात आली. त्यानुसार कृषी केंद्र सलंगटोला (ता. सालेकसा), किसान कृषी केंद्र चिकित्सालय साखरीटोला (ता. सालेकसा), राऊत कृषी केंद्र साखरीटोला (ता. सालेकसा), ओम साई कृषी केंद्र मुंडीपार (ता.गोरेगाव), शेतकरी कृषी सेवा केंद्र (ता.सडक अर्जुनी), मानकर कृषी सेवा केंद्र देऊटोला (ता. गोरेगाव) या सहा कृषी केंद्रांना सक्त ताकीद देण्यात आली आहे.

नऊ कृषी केंद्र सुरुच झाले नाही - कृषी केंद्राचे परवाने घेऊनसुद्धा आजपावेतो कृषी केंद्र सुरू न केल्यामुळे व व्यवहार न केल्यामुळे ९ कृषी केंद्रांचे परवाने रद्द करण्यात येत आहे. 

खतांची साठेबाजी करणे, खतांचा काळाबाजार करणे किंवा अनुदानित खते परराज्यांत विक्री करणे आदी प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित विक्रेत्यांचा परवाना कीटकनाशक कायदा १९६८ व खत नियंत्रण आदेश १९८३ तसेच बियाणे कायदा १९६६ अंतर्गत निलंबित करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. - हिंदुराव चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र