शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यातील अडीच लाख विद्यार्थी लिहिणार व्यसनमुक्तीसाठी पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 16:02 IST

जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून गोंदिया जिल्ह्यातील सर्व शाळांमधील अडीच लाख विद्यार्थी एक पत्र व्यसनमुक्तीसाठी ४ फेब्रुवारीला लिहिणार आहेत.

ठळक मुद्देएक पत्र व्यसनमुक्तीसाठी व्यसन सोडविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दारु, तंबाखू, गुटखा आदीचे व्यसन अलीकडे तरुणपिढीमध्ये वाढत आहे. याला शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी सुध्दा अपवाद नाहीत. परिणामी दरवर्षी कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत. व्यसनाचे व्यक्तीच्या आरोग्य व समाजावर सुध्दा परिणाम होत आहे. हे चित्र बदलण्याकरिता व व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील सर्व शाळांमधील अडीच लाख विद्यार्थी एक पत्र व्यसनमुक्तीसाठी ४ फेब्रुवारीला लिहिणार आहेत.जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसह इतर खासगी शाळांमध्ये सुध्दा हा उपक्रम ४ फेब्रुवारीला राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम राबविण्यापूर्वी विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याचे फायदे, तंबाखूमुक्तीचे मार्ग उपाय, तंबाखू नियंत्रण कायद्याचे पाच मुख्य नियम, तंबाखूमुक्त शाळा याबद्दलची माहिती शाळेतील प्रार्थनेनंतर विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांकडून आपल्या व्यसन करणाऱ्या भावासाठी, मित्रासाठी आणि कुटुंबातील सदस्यांसाठी व्यसनमुक्तीवर नाविन्यपूर्ण पत्र लिहिण्याची पूर्व तयारी करुन घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे पत्र लेखनासाठी टाकाऊ वस्तू, पाने, फुले, जुने ग्रिटींग कार्ड आदींचा वापर विद्यार्थी करणार आहेत. एक पत्र व्यसनमुक्तीसाठी हा नाविण्यपूर्ण उपक्रम असून विद्यार्थ्यांवर शालेय जीवनापासूनच व्यसनमुक्तीचे संस्कार व्हावे हा देखील या मागील हेतू आहे. विद्यार्थ्यांनी पत्र लिहिल्यानंतर ते पत्र विद्यार्थी त्यांच्या कुटुंबातील सदस्य, शेजारी व व्यसन करणाऱ्या व्यक्तींना वाचून दाखविणार आहेत. व्यसन करणाऱ्यांना व्यसनाधिनेचे दुष्परिणाम सांगून त्यांच्याकडून यापुढे मी कोणतेही व्यसन करणार नाही असे वचन घेणार आहेत. येथेच विद्यार्थ्यांची जबाबदारी संपणार नसून ज्या व्यक्तींना व्यसनमुक्त होण्याचे शपथ दिली त्यांनी खरोखरच व्यसन सोडले की नाही, याचा कमीत कमी सहा महिने पाठपुरावा करणार आहेत. शाळेतील किती विद्यार्थ्यांनी किती जणांना पत्र लिहिले याची सुध्दा नोंद ठेवली जाणार आहे. या उपक्रमाची प्रभाविपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने सर्व शाळांना दिल्याची माहिती आहे.विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र भूषण प्रमाणपत्राने गौरवएक पत्र व्यसनमुक्तीसाठी या उपक्रमातंर्गत विद्यार्थी व्यसनमुक्तीवर पत्र लिहून त्याचे वाचन व्यसन करणाºया व्यक्तीसमोर करणार आहे. तसेच त्यांना व्यसनाचे दुष्परिणाम आणि त्याचे समाजाचे होणारे परिणाम पटवून देतील.यानंतर त्यांच्याकडून व्यसन सोडण्याचे वचन घेवून त्याचा सहा महिने पाठपुरावा करतील. त्यानंतर व्यसन सोडण्यासाठी यशस्वी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सलाम मुंबई फाऊंडेशनतर्फे महाराष्ट्र भूषण हे प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.

शाळेच्या सूचना फलकावर माहितीएक पत्र व्यसनमुक्तीसाठी या उपक्रमातंर्गत शाळेतील किती विद्यार्थ्यांनी पत्र लिहिली आणि त्यानंतर याचा पाठपुरावा घेतला. याची संख्या प्रत्येक शाळेतील सूचना फलकावर लिहून ठेवली जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक तालुक्यातील माहिती गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे गोळा केली जाणार आहे. .........

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र