शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

कनेरीचा सर्वांगीण विकास करू

By admin | Updated: February 24, 2016 01:41 IST

कनेरीच्या सर्वांगीण विकासासाठी यंत्रणांनी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी.

पालकमंत्री बडोले : अंमलबजावणीच्या कार्यात ग्रामस्थांना सहभागी करागोंदिया : कनेरीच्या सर्वांगीण विकासासाठी यंत्रणांनी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. त्यासोबतच ग्रामस्थांना अंमलबजावणीच्या कार्यात सहभागी करून घ्यावे, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.सडक-अर्जुनी तालुक्यातील कनेरी-राम या गावाची निवड पालकमंत्री बडोले यांनी आमदार आदर्श गाव योजनेंतर्गत केली आहे. गावाच्या सर्वांगिन विकासाच्या दृष्टीने कनेरी-राम येथे नुकतीच पालकमंत्री बडोले यांनी विविध यंत्रणांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा सभा घेतली. याप्रसंगी ते बोलत होते.सभेला जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, जिल्हा परिषद सदस्य माधुरी पाथोडे, पंचायत समती उपसभापती विलास शिवणकर, पं.स. सदस्य लीलाधर हत्तीमारे, सरपंच इंदिरा मेंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत मोठ्या प्रमाणात गावाचा कायापालट करण्याची क्षमता आहे. यंत्रणांनी सहयोगातून विविध विकासकामे करण्यासाठी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन काम करावे. विविध योजनांच्या अंमलबजावणीचा लाभ गरजू लाभार्थ्यांना द्यावा. शाळेत आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. कोणताही बालक शालेय शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी. गावातील सर्व कुटूंब शौचालयाचा नियमित वापर करतील यासाठी ग्रामस्थांना शौचालयाचे महत्व पटवून द्यावे. ई- लर्निंगचा उपक्र म शाळेत सुरु करावा. गावातील कोणीही निरक्षर राहणार नाही, यासाठी निरक्षरांचे साक्षरता वर्ग, शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पांदन रस्ते तयार करावे असे सांगून पालकमंत्री बडोले म्हणाले, पांदण रस्त्यांच्या सुविधेमुळे शेतकऱ्यांना शेतातील उत्पादित माल बाजारपेठेत सहजपणे घेऊन जाणे शक्य होईल. कनेरीत कोणीही बेघर व्यक्ती घरकुलाच्या लाभापासून वंचित राहणार नाही, यासाठी पंचायत समतीने लक्ष द्यावे. सर्व समाजातील व्यक्तींसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी यंत्रणांनी नियोजन करावे, असे ते म्हणाले.डॉ. सूर्यवंशी म्हणाले, आरोग्य विभागाच्या विविध योजना गावात प्रभावीपणे राबवाव्यात. खरा लाभार्थी हा योजनेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी. शाळेतील सर्व मुले स्कॉलरशिप परीक्षेला बसली पाहिजे, याचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना दिल्या.सभेला जिल्हा नियोजन अधिकारी बकुल घाटे, मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त समीर परवेज, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता वाकडे, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रभारी प्रकल्प अधिकारी मीनाक्षी उन्हाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बागडे, देशमुख, लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कठाडे, तहसीलदार परळीकर, प्रभारी गटविकास अधिकारी झामिसंग टेंभरे, तालुका कृषी अधिकारी पेशट्टीवार, क्रीडा अधिकारी निमगडे यांच्यासह जिल्हा व तालुकास्तरीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)