शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
पत्नीसोबत Post Office च्या स्कीममध्ये करा गुंतवणूक; दर महिन्याला मिळेल ₹९००० चं फिक्स व्याज
4
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
5
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
6
बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
7
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
8
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
9
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
10
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
11
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
12
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
13
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
14
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
15
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
16
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
17
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
18
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
19
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
20
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती

महिलांना योजनांची माहिती द्या

By admin | Updated: February 26, 2016 02:03 IST

महिला आर्थिक विकास महामंडळाने ग्रामीण भागातील महिलांचे संघटन करुन त्यांना बचतीची सवय लावली.

मिलिंद कंगाली: ४६० गावांत ४ हजार ३७३ बचत गटगोंदिया : महिला आर्थिक विकास महामंडळाने ग्रामीण भागातील महिलांचे संघटन करुन त्यांना बचतीची सवय लावली. पुढे त्यांच्या स्वावलंबनच्या दृष्टीने त्यांना उद्योग-व्यवसायाकडे वळविले. आर्थिक स्वावलंबनामुळे त्या आता सक्षम होत आहे. महिलांनी आता ग्राम विकासाच्या व लाभार्थ्याना योजनांची माहिती द्यावी, असे मत नाबार्डचे सहायक महाव्यवस्थापक मिलिंद कंगाली यांनी व्यक्त केले. २४ फेब्रुवारी रोजी गोंदिया येथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ कोकण ग्रामीण विकास बँकेचे जिल्हा समन्वय अधिकारी ट.ीएम. चिंधालोरे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, अदानी फाऊंडेशनचे सुबोध सिंग, आयसीआयसीआय बँकेचे व्यवस्थापक स्वप्नील वडगावकर, सारडा संस्थेचे राज्य समन्वयक एस.आर. केदारी उपस्थित होते.कंगाली पुढे म्हणाले, बचत गटांना पतपुरवठा करण्यास बॅकांची उदासीनता दिसून आली. बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूच्या गुणवत्तेवर भर द्यावा. बचत गटांनी आता बाजारपेठेची गरज ओळखून उत्पादन तयार करावे. वनस्पतीपासून सौंदर्य प्रसाधने तयार करुन त्याची बाजारपेठेत विक्र ी करावी. असा सल्लाही दिला. चिंधालोरे म्हणाले, बचत गटाचा हिशेब चोखपणे ठेवावा. हिशेब चोखपणे न ठेवल्यास बचत गटांच्या सदस्यांमध्ये भांडणे निर्माण होतात. त्यामुळे चांगल्या प्रकारे चालत असलेला बचत गट बंद होतो. भांडणाचा विपरीत परीणाम सदस्यांच्या आर्थिक विकासावर होतो. बचत गटातील प्रत्येक म्ािहलेला त्याच्या व्यवहाराची माहिती असली पाहिजे. बचत गटाच्या विविध प्रकारच्या निर्णय प्रक्रियेत प्रत्येक महिलांनी सहभागी असले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे म्हणाले, केवळ चूल आणि मूल या क्षेत्रापुरताच मर्यादित महिला आता राहिलेल्या नाही. आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करतांना दिसत आहे. सावित्रीबाई फुलेचा आदर्श पुढे ठेऊन महिलांची वाटचाल सुरु आहे. महिलांनी आता उद्योग व्यवसायासोबतच समाजाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय विकासाकडे लक्ष द्यावे. विविध शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवाव्यात. सामाजिक उपक्रम राबवून आरोग्य, शिक्षण व पिण्याचे पाणी सर्वांना मिळेल यासाठी महिलांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.सुबोधिसंग म्हणाले, महिलांमध्ये आत्मविश्वास आहे. हाच आत्मविश्वास त्यांना सन्मानाकडे घेऊन जातो. आर्थिक स्वावलंबनासाठी बचत गट हे महिलांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. महिला बचतगटांनी शिस्तीने काम करावे. बचतगटांनी काही प्रस्ताव अदानी फाऊंडेशनला दिले तर निश्चित मदत करण्यात येईल. बचत गटांनी रोपटयांची नर्सरी तयार केली तर रोपटयांची खरेदी अदानी फाऊंडेशन करेल असे सांगून बचत गटांनी अनुदानावर आता अवलंबून राहू नये स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले. प्रास्ताविकातून माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे म्हणाले, महिलांना सक्षम करण्याचे काम माविम करीत आहे. महिलांची क्षमता बांधणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यात ४६० गावांमध्ये ४ हजार ३७३ स्वयंसहायत बचत गट असून ५३ हजार २४२ महिला बचत गटांच्या सदस्य आहेत. दर महिन्याला सदर महिला ३७ लाख २६ हजार रुपयांची बचत गटामध्ये बचत करीत आहे. तिरोडा व सालेकसा तालुक्यातील २०० गावांमध्ये माविम महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबवीत आहे. बचत गटातील महिला वेगवेगळे उपक्रम राबवून सामाजिक कार्यात सहभाग घेत आहे, असे सांगितले.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी पाहुण्यांनी माविमच्या सहयोगिनी व व्यवस्थापक यांनी बचत गटांच्या लिहिलेल्या यशोगाथा प्रदर्शनाचे अवलोकन केले. स्नेहसंमेलन कार्यक्रमाला जिल्ह्यातील माविमच्या लोकसंचालित साधन केंद्राचे व्यवस्थापक, कर्मचारी व सहकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी आशा दखने, हेमलता वासनिक, माया कटरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. संचालन सहायक नियंत्रण अधिकारी प्रदीप कुकडकर यांनी तर आभार सहायक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड यांनी मानले. यशस्वीतेसाठी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)