शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पक्षकारांना केंद्रबिंदू मानून योग्य न्याय मिळवून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 21:17 IST

भारतीय राज्यघटना ही भारतीयांसाठी एक महत्त्वाचा दस्ताऐवज आहे. राज्यघटनेच्या माध्यमातून देशात लोकशाही व्यवस्था अस्तित्वात आली आहे.लोकशाही व्यवस्थेच्या माध्यमातून न्यायपालिका ही नि:पक्षपणे न्याय देण्याचे काम करते. मार्ग काढला तर निश्चितच मार्ग निघतो.

ठळक मुद्देमुरलीधर गिरटकर। न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : भारतीय राज्यघटना ही भारतीयांसाठी एक महत्त्वाचा दस्ताऐवज आहे. राज्यघटनेच्या माध्यमातून देशात लोकशाही व्यवस्था अस्तित्वात आली आहे.लोकशाही व्यवस्थेच्या माध्यमातून न्यायपालिका ही नि:पक्षपणे न्याय देण्याचे काम करते. मार्ग काढला तर निश्चितच मार्ग निघतो. पक्षकारांना केंद्रबिंदू मानून त्यांना योग्य न्याय मिळवून देऊन न्याय व्यवस्थेला प्रगतीपथावर न्यावे.असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी केले.सडक अर्जुनी येथील दिवाणी व फौजदारी न्याययालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन शनिवारी (दि.२२) करण्यात आले. या वेळी ते उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुहास माने हे होते. या वेळी प्रामुख्याने नगराध्यक्ष देवचंद तरोणे, पोलीस अधीक्षक विनीता शाहू, जिल्हा न्यायाधीश एस.बी.पराते, जिल्हा न्यायाधीश अमित जोशी, भंडाऱ्याचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश खुणे आणि शर्मा, सहदिवाणी न्यायाधीश गोंदिया एन.आर.वानखडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एम. बी. दुधे, मुख्य न्यायदंडाधिकारी गोंदिया एन.जी.देशपांडे, सहायक संचालक सरकारी अभियोक्ता चंदन रणदिवे, गोंदिया जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. टी. बी. कटरे, वकील संघाचे सचिव अ‍ॅड. सचिन बोरकर, सडक अर्जुनी वकील संघाचे सचिव डी.एस.बंसोड तसेच अ‍ॅड. एस. बी. गिºहेपुंजे, अ‍ॅड.गहाणे, अ‍ॅड. रहांगडाले, अ‍ॅड. अनमोल राऊत, अ‍ॅड. पोर्णिमा रंगारी,सा. बां. विभागाचे कार्यकारी अभियंता गाणार, उपअभियंता लांजेवार उपस्थित होते. न्यायमूर्ती गिरटकर म्हणाले, गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात न्यायालयाची स्वतंत्र इमारत तयार व्हावी, यासाठी सतत पाठपुरावा करु न प्रयत्न केले. त्यामुळे जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमध्ये सुसज्ज अशी न्यायालयाची इमारत तयार झाली आहे. देवरी तालुका न्यायालयाच्या इमारतीसाठी काही प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्या अडचणी सुध्दा आता दूर झाल्यामुळे देवरी येथील न्यायालयाच्या इमारत बांधकामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे सांगितले.गोंदिया व भंडारा येथील वकीलांमध्ये जागरुकता आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य समजून पक्षकारांना पारदर्शकपणे न्याय देण्याचा प्रयत्न करावा. जिल्ह्याच्या न्यायव्यवस्थेतील काही अडचणी असल्यास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी समन्वयाचा मार्ग काढून योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले. न्यायाधीश सुहास माने म्हणाले, तालुका न्यायालयाची इमारत ही यापूर्वी भाड्याच्या इमारतीत होती. सन २०१६ मध्ये या इमारतीच्या बांधकामाला सुरु वात करण्यात आली व २०१९ मध्ये ही इमारत पूर्णत्वास आली. आता या सुसज्ज अशा न्यायालयाच्या नवीन इमारतीत न्यायव्यवस्थेतील अधिकाºयांनी नेहमी सतकर्म करीत रहावे. प्रत्येक खटला हा लवकरात लवकर कसा संपवता येईल याकडे लक्ष केंद्रीत करु न न्यायालयाचे पावित्र्य कायम ठेवावे.यावेळी सडक अर्जुनीचे दिवाणी न्यायाधीश एन.आर.ढोके यांनी मनोगत व्यक्त केले. मंचावर उपस्थित मान्यवरांना स्मृतीचिन्ह म्हणून भारताचे संविधान हा ग्रंथ भेट देण्यात आला.मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सडक अर्जुनी तालुका वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.राजेंद्र लंजे यांनी केले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन तालुका वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.दिलीप कातोरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार देवरी तालुका वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.पी.एन.संगीडवार यांनी मानले. 

टॅग्स :Courtन्यायालय