शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

समाज मंदिरात विद्यार्थ्यांना धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 21:48 IST

ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शिक्षणाचा कायदा लागू करण्यात आला. शिक्षणासाठी सुसज्ज इमारतीसह आवश्यक शैक्षणिक साहित्य पुरविण्याची जबाबदारी शिक्षण विभाग व संबंधित यंत्रणेची आहे.

ठळक मुद्देवर्गखोल्या जीर्ण : चिमुकल्यांचे जीव मुठीत घेवून विद्यार्जन

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शिक्षणाचा कायदा लागू करण्यात आला. शिक्षणासाठी सुसज्ज इमारतीसह आवश्यक शैक्षणिक साहित्य पुरविण्याची जबाबदारी शिक्षण विभाग व संबंधित यंत्रणेची आहे. मात्र अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या ग्राम घुसोबाटोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील २५ विद्यार्थी वर्ग खोल्यांना गळती लागल्याने चक्क समाज मंदिरात बसून धडे घेत असल्याचे चित्र आहे.बोंडगावदेवी जिल्हा परिषद क्षेत्रातंर्गत येणाऱ्या ग्राम घुसोबाटोला येथे वर्ग १ ते ४ पर्यंत शिक्षणाची सोय आहे. सद्यस्थितीत १४ मुली व ११ मुले असे २५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथे कार्यरत असलेले शिक्षक आजारामुळे रजेवर असून मुख्याध्यापिका म्हणून मंजुषा कावळे व प्रतिनियुक्तीवर असलेल्या संध्या भाजिपाले या दोन शिक्षिका जबाबदारी सांभाळीत आहेत. शाळेची इमारत फार जुनी आहे. तर वर्ग खोल्या जीर्णावस्थेत आहे.वर्ग खोल्यांचे स्लॅब ठिकठिकाणी गळत आहे. तर काही ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या आहेत.थोडाही पाऊस आला तरी सर्व वर्ग खोल्या गळतात. जिथे विद्यार्थी बसतात त्याच ठिकाणी पाणी गळते. वर्ग खोलीमध्ये विद्युत पुरवठा केला असल्याने, साधरण पावसाच्या सरीने भिंतींना करंट येत असल्याचे शिक्षिकांनी सांगितले. पाणी गळत असल्याने शाळेचे कार्यालयीन साहित्य, संगणक व इतर साहित्य जिथे मुले बसतात त्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे.पावसाळ्यात वर्ग खोल्या गळत असल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षण विभागाला दिली. मात्र अद्यापही कुठल्याच उपाय योजना करण्यात आल्या नाही. अशात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून त्यांना समाज मंदिरात बसवून शिकविले जात आहे.