शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

कृषी संजीवनीकडे शेतकऱ्यांची पाठ

By admin | Updated: September 13, 2014 01:58 IST

थकीत बाकी असलेल्या वीज बिलांवर ५० टक्के माफी देणाऱ्या कृषी संजीवनी योजनेने राज्यभरात धूम माजविली आहे.

कपिल केकत गोंदियाथकीत बाकी असलेल्या वीज बिलांवर ५० टक्के माफी देणाऱ्या कृषी संजीवनी योजनेने राज्यभरात धूम माजविली आहे. जिल्ह्यात १२ हजार २५६ थकबाकीदार शेतक ऱ्यांच्या कृषी पंपांना ही योजना संजीवनी देणारी ठरणार आहे. मात्र जिल्ह्यात या योजनेला जिल्ह्यात पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांकडे थकून असलेल्या पाच कोटी २५ लाख ५२ हजार रूपयांपैकी अद्याप एक कोटी २० लाख ४८ हजार रूपयेच महावितरणला प्राप्त झाले आहेत. नियमीत वीज बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांचा यात समावेश आहे. येत्या ३१ आॅक्टोबरनंतरच किती थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला हे स्पष्ट होणार आहे. कधी अतिवृष्टी तर कधी गारपिटीने झोडपून काढलेल्या शेतकऱ्यांना आधार देता यावा म्हणून राज्य शासनाने महावितरणला सोबत घेत कृषी संजीवनी योजना राज्यात सुरू केली आहे. १ आॅगस्ट २०१४ पासून राबविल्या जात असलेल्या या योजनेंतर्गत कृषी पंपधारकांना थकलेल्या वीज बिलावर ५० टक्के माफीसोबतच थकीत वीज बिलावरील व्याज व दंड पूर्णपणे माफ केले जाणार आहे. यासाठी अशा अनियमीत कृषी पंपधारक शेतकऱ्यांना त्यांच्याकडील थकीत रक्कम येत्या ३१ आॅक्टोबरपर्यंत एकरकमी किंवा तीन मासिक हप्तात भरावयाची आहे. जिल्ह्यात २१ हजार ३३१ कृषी पंपधारक असून यातील अनियमीत वीज बिल भरणा करणारे १२ हजार २५६ पंपधारक आहेत. यावरून या १२ हजार २५६ पंपधारकांसाठीच ही योजना संजीवनी बनून आल्याचे दिसून येते. कारण या योजनेच्या मुदतीत त्यांनी त्यांच्याकडील थकीत रक्कम न भरल्यास विद्युत कायदा २००३ नुसार वसुलीकरिता त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र असे असतानाही एवढ्या फायदेशीर योजनेला जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यातील कृषी पंप धारकांवर महावितरणचे पाच कोटी २५ लाख ५२ हजार रूपये थकीत आहेत. शिवाय ९४ लाख ७८ हजार रूपयांचे व्याज व १० लाख ५१ हजार रूपये दंडाची रक्कम आहे. मात्र महावितरणच्या ३१ आॅगस्टपर्यंतच्या आकडेवारीनुसार, कृषी पंपधारकांकडून एक कोटी २० लाख ४८ हजार रूपये प्राप्त झाले असल्याचे महावितरणचे लेखाधिकारी वाघ यांनी सांगितले.