शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

१३ हजार वीज ग्राहकांची आॅनलाईनकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 22:12 IST

महावितरणच्या गोरेगाव उपविभागांतर्गत वीज ग्राहकांची संख्या २२ हजार आहे. मात्र हायटेक तंत्रज्ञानाच्या युगातही तालुक्यातील १३ हजार ग्राहकांनी आॅनलाईन वीज बिल भरण्याकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. महावितरणने पोस्ट आॅफीस, बँक, आॅनलाईन व स्वत:ची आऊटलेट संस्था बिल भरण्यासाठी खुली केली असली तर पोस्ट आॅफीसमध्ये बिल भरताना होणाऱ्या अडचणीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देमाहितीचा अभाव : तालुक्यात महावितरणचे २२ हजार वीज ग्राहक

दिलीप चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : महावितरणच्या गोरेगाव उपविभागांतर्गत वीज ग्राहकांची संख्या २२ हजार आहे. मात्र हायटेक तंत्रज्ञानाच्या युगातही तालुक्यातील १३ हजार ग्राहकांनी आॅनलाईन वीज बिल भरण्याकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. महावितरणने पोस्ट आॅफीस, बँक, आॅनलाईन व स्वत:ची आऊटलेट संस्था बिल भरण्यासाठी खुली केली असली तर पोस्ट आॅफीसमध्ये बिल भरताना होणाऱ्या अडचणीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.महावितरणकडे उपलब्ध आकडेवारीनुसार तालुक्यात २२ हजार वीज ग्राहकांपैकी फक्त ९ हजार ग्राहकांनी आॅनलाईन वीज बिल भरले आहे. ग्राहकांचा आॅनलाईन वीज बिल भरणा प्रणालीला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा महावितरणकडून केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र ४५ टक्के ग्राहकांनीच आॅनलाईन वीज बिल भरण्यासाठी प्राधान्य दिले आहे. वीज ग्राहकांना संगणक व मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यातून ग्राहकांचा वेळ व श्रमाची बचत होते. तासनतास रांगेत थांबण्याची गरज भासू नये यासाठी महावितरणने संकेतस्थळ कार्यान्वित केले आहे.शिवाय मोबाईल अ‍ॅप उपलब्ध करुन दिले आहे. या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या तरी ग्रामीण भागातील ग्राहकांकडून आॅनलाईन प्रणालीला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. तालुक्यातील महावितरणच्या ग्राहकापैकी १३ हजार ग्राहक पोस्ट आॅफीस व महावितरणच्या आऊटलेटमध्ये वीज बिल भरतात. मात्र ग्राहकांना ग्रामीण भागात वीज बिल भरतांना मोठी अडचण येते. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना उशीरा बिल जमा केल्याच्या नावावर अधिकचा भुर्दंड सहन करावा लागतो. एकीकडे वीेज वितरण महामंडळाचे उशीरा वीज बिल वाटप तर दुसरीकडे वीज बिल भरण्याची अडचण यामुळे वीज कपात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.एसएमएससाठी मोबाईल क्रमांक नोंदणीमहावितरणच्यावतीने वीज ग्राहकांसाठी एसएमएस सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी मोबाईल क्रमांकाची नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याशिवाय ग्राहकांना विविध सेवांची माहिती मिळावी व तक्रारीचे निवारण करण्यासाठी टोल फ्री क्रमांकही दिला आहे.भाषेचा पर्याय उपलब्धमहावितरणच्यावतीने ग्राहकांना आपले वीज बिल भरण्यासाठी मराठी आणि इंग्रजी भाषेतील अप्लिकेशन देण्यात आले आहे. ही सेवा २४ तास उपलब्ध आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना आपले वीज बिल भरण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही असा महावितरणचा दावा आहे.पोस्ट आॅफीसमध्ये वीज बिल भरतांना ग्राहकांना मोठी अडचण होते. त्यामुळे अनेकवेळा ग्राहकांच्या वीज बिलावर दुसºया महिन्याचे वीज बिल जोडून येते. त्यामुळे ग्राहकांना मोठा भुर्दंड सहन करावा लागतो. या प्रकारावर उपाय म्हणून महावितरणची आऊटलेट उघडून ग्राहकांना चांगली सेवा देता येईल.- ए.डी.भांडारकर, उपविभागीय अभियंता, महावितरण, गोरेगाव.