शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

बिबट झाला जेरबंद

By admin | Updated: July 15, 2015 02:09 IST

ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट असलेल्या बोंडे या गावी सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक बिबट कोंबड्यावर ताव मारण्यासाठी आला.

हुशारी नागरिकांची : वन्यजीव विभागाने सोडले वनातनवेगावबांध : ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट असलेल्या बोंडे या गावी सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक बिबट कोंबड्यावर ताव मारण्यासाठी आला. परंतु नागरिकांनी हुशारीने त्याला खोलीत डांबून ठेवले. वन्यजीव विभागाच्या पथकाने त्याला पिजऱ्यांमध्ये जेरबंद करून नंतर त्याला जंगलात सोडून देण्यात आले. सदर घटना सोमवार व मंगळवारच्या रात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडली. सविस्तर वृत्त असे की, जंगलालगतच्या गावांमध्ये कोंबड्या, बकऱ्या व कुत्र्यांची शिकार करण्यासाठी रात्रीच्या सुमारास बिबट येतात. ही नित्याचीच बाब झाली होती. बोंडे येथेदेखील अनेकांकडे कोंबड्या व बकऱ्या पाळल्या जातात. बिबट्याला मात्र गावातील कोंबड्याची शिकार करण्याची चटक लागली. रविवारच्या रात्रीदेखील सदर बिबट गावामध्ये आला व याने खुशाल काशिवार यांच्या घरची कोंबडी फस्त केली. बिबट्याला मात्र हमखास शिकार मिळण्याचे ठिकाण माहीत झाले होते. सोमवारच्या रात्रीदेखील १२.३० वाजताच्या सुमारास बिबट्या आला व कोंबड्या ठेवलेल्या खोलीत शिरला. बिबट्या नक्की येणारच अशी खात्री ठेवून स्थानिक नागरिक खुशाल काशिवार आणि त्यांची चमू बिबट्याच्या पाळतीवरच होते. बिबट्या खोलीमध्ये शिरताच त्यांनी खोलीचे दार बाहेरून बंद केले. यानंतर घाबरून बिबट्या खोलीच्या सज्जावर जावून बसला. यानंतर भ्रमणध्वनीवरून वन्यजीव विभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्तदेखील लावण्यात आला होता. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्या पिंजऱ्यात शिरला व सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. बोंडे या गावाशेजारी फारसे जंगलदेखील नाही. मग बिबट्या येथे कसा आला? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. वास्तविकपणे जंगली प्राण्यांना जेव्हा जंगलात पुरेसे अन्न खायला मिळत नाही तेव्हाच ते आपले अधिवास सोडून गावामध्ये प्रवेश करतात, असे वन्यजीव प्रेमी व नागरिकांचे म्हणणे आहे.वन्यजीवांच्या संरक्षणासाठी राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये तयार करण्यात येतात. परंतु तेथेदेखील वन्यजीव सुरक्षित नाहीत, हे यावरून दिसून येते. यासाठी वन्यजीव विभाग व वनविभागाने विशेष प्रयत्न करून मानवी वस्त्यांना सुरक्षित करावे, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)