शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
3
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
4
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
5
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
6
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
7
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
8
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
9
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
10
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
11
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
12
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
13
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
14
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
16
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
17
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
18
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
19
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
20
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल

कार्यकर्त्यांची नाळ जोडून ठेवणारा नेता

By admin | Updated: June 4, 2014 00:08 IST

पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून सर्वांना पकडून ठेवणारे गोपीनाथ मुंडे अचानक काळाच्या पडद्याआड गेले. नुकतेच केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेऊन आपल्या जीवनातील नव्या अध्यायाची सुरूवात होते न होते

चाहत्यांत शोकाकूल वातावरण : भाजप पदाधिकारी अंत्ययात्रेसाठी रवानागोंदिया : पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून सर्वांना पकडून ठेवणारे गोपीनाथ मुंडे अचानक काळाच्या पडद्याआड गेले. नुकतेच केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेऊन आपल्या जीवनातील नव्या अध्यायाची सुरूवात होते न होते तोच त्यांचा जिवनाच्या अध्यायालाच देवाने पूणर्विराम लावला. देशपातळीवरच राजकारण करणारे व्यक्तिमत्त्व असतानाही त्यांचे गोंदियाशी नाते जुळलेले होते. त्यांचा मोठा चाहता वर्ग गोंदियातही असल्याने सकाळपासूनच त्यांच्या चाहत्यांत शोकाकूल वातावरण दिसून येत होते. भारतीय जनता पक्षाला असहनीय धक्का लागला असून सर्वच पदाधिकारीही या घटनेवर विश्‍वास करीत नव्हते. त्यांच्या गोंदिया भेटीचा एक प्रसंग सन २00५ मध्ये आला होता. जिल्हा परिषदेच्या निवडणुक प्रचारार्थ गोंदियात मुंडे आले होते. येथील सिव्हील लाईंस निवासी अभय सावंत हे त्यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे सक्रीय पदाधिकारी असल्याने त्यांचे ंमुंडेंशी जवळचे संबंध निर्माण झाले होते. यातूनच मुंडे यांनी सावंत यांच्या निवासस्थानी बैठक घेतली होती. यावेळी त्यांच्या सोबत माजी अथर्मंत्री महादेवराव शिवणकर, त्यांचे निकटवर्ती पाशा पटेल, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश संघटनमंत्री श्रीकांत भारतीय सोबत होते. तर त्यानंतर सन २00९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ गोंदियात आले असता त्यांनी दुसर्‍यांदा सावंत परिवाराच्या निवासस्थानी भेट दिली होती. दोन्ही भेटीत सावंत परिवाराने त्यांच्यातील साधेपणा व सर्व सामान्यांना जपणारा माणूस ओळखला होता. लहानात लहान कार्यकर्ता का असोना मात्र त्याचीही काळजी करणारा हा सच्चा नेता होता. भाषणातून आक्रमक दिसणारे मात्र मनातून तेवढेच हळवे असणारे मुंडे आपल्या स्वभावामुळेच सर्वांच्या मनावर आपली छाप सोडून जात असल्याचे द्वारकाताई सावंत यांनी बोलून दाखविले. तर नेतृत्वात पक्षासाठी काम करण्याची संधी मिळाल्याने त्यांना ओळखता आले व त्यावरूनच कार्यकर्त्यांची नाळ जोडून ठेवणारा सच्चा नेता हरपल्याची प्रतिक्रिया भाजपुमोचे माजी प्रदेश सदस्य अभय सावंत यांनी व्यक्त केली. तर मुंडे यांच्या निधनाची बातमी कळताच येछील भाजपचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने त्यांच्या अंत्येष्टीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी  रवाना झाले आहेत. (शहर प्रतिनिधी)