शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती ४ रोजी

By admin | Updated: February 3, 2017 01:43 IST

शिक्षणमहर्षी लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांची जयंती ४ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता भवभूती महाविद्यालय आमगाव येथे साजरी होणार आहे.

आमगाव : शिक्षणमहर्षी लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांची जयंती ४ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता भवभूती महाविद्यालय आमगाव येथे साजरी होणार आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले हे जयंती महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. अतिथी म्हणून उच्चशिक्षण नागपूर विभागाचे सहसंचालक डॉ. अंजली राहाटगांवकर, प्रांत प्रचारक रा.स्व. संघ विदर्भ प्रांत नागपूरचे प्रसाद महानकर, खासदार अशोक नेते, आ. संजय पुराम उपस्थित राहतील.याप्रसंगी नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य गिरीष व्यास, परिणय फुके, नगराध्यक्ष अशोक इंगळे गोंदिया, नगराध्यक्ष सोनाली देशपांडे तिरोडा यांचा सत्कार होणार आहे. सोबत माजी खासदार हरीश मोरे, डॉ. गजानन डोंगरवार, नटवरलाल गांधी, नाना नाकाडे, भरत क्षत्रिय, चि.तू. पटले यांचाही सत्कार होणार आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना संधी टापर्स अ‍ॅवार्ड, भवभूती महाविद्यालयाच्या उत्कृष्ट विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात येणार आहेत.श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती महोत्सवासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भवभूती शिक्षण संस्थेचे कार्यवाह माजी आ. केशवराव मानकर, अध्यक्ष सुरेशबाबू असाटी, उपाध्यक्ष प्रमोद कटकवार, संचालक मंडळ व समारोह संयोजक डॉ. श्रीराम भुस्कुटे, प्राचार्य डॉ. डी.के. संघी, मुख्याध्यापक डी.एम. राऊत, रंजित डे, एम.एन. कोटांगले यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी) संघी टॉपर्स अवॉर्ड संघी परिवार गोंदियातर्फे प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना संघी टॉपर्स अवॉर्डने गौरविण्यात येते.यंदाही या पुरस्काराचे वितरण शिक्षण महर्षी लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंतीनिमित्त शनिवारी भवभूती महाविद्यालय, आमगाव येथे होणार आहे. या पुरस्कारासाठी लक्ष्मणराव मानकर इंन्स्टीट्यूट आॅफ फार्मसीचे विद्यार्थी विपुल वसंता पडोले, ज्योती गुलाबराव बिसेन, तंत्रनिकेतनचा विद्यार्थी अभिशेख पिमेश्वर कटरे, आदर्श विद्यालय आमगाव बारावी विज्ञानची विद्यार्थिनी शामली संतोष मिश्रा, आदर्श विद्यालय येथील दहावीची विद्यार्थिनी मानसी तामेश्वर रहांगडाले व भवभूती महाविद्यालयातून बीएससीमधून रोशनी घनश्याम मेंढे यांना गौरविण्यात येणार आहे.