शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जन्मापासून मृत्यूपर्यंत कायद्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 20:47 IST

प्रत्येकाला अधिकार मिळावा, समाजात वावरताना कुणावरही अन्याय होता कामा नये. प्रत्येकाला त्याच्या मूलभूत हक्कापासून वंचित केले जाऊ नये. कायद्याच्या चाकोरीतूनच उत्तम समाज निर्मिती व्हावी. महिलांना समाजात सन्मान मिळावा. कायदे मनुष्याच्या हितासाठीच झाले आहेत.

ठळक मुद्देस्वप्नील रामटेके : तालुका विधी सेवा समितीचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : प्रत्येकाला अधिकार मिळावा, समाजात वावरताना कुणावरही अन्याय होता कामा नये. प्रत्येकाला त्याच्या मूलभूत हक्कापासून वंचित केले जाऊ नये. कायद्याच्या चाकोरीतूनच उत्तम समाज निर्मिती व्हावी. महिलांना समाजात सन्मान मिळावा. कायदे मनुष्याच्या हितासाठीच झाले आहेत. प्रत्येक नागरिकांनी कायद्याचा दुरुपयोग होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे. समाजात वावरणाऱ्या प्रत्येकाला जन्मापासून मृत्यूपर्यंत कायद्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन अर्जुनी-मोरगाव येथील दिवानी न्यायाधीश स्वप्नील रामटेके यांनी केले.बोंडगावदेवी येथील सार्वजनिक रंगमंदिरात मंगळवारी लोकअदालत आयोजित करण्यात आली होती. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. तालुका विधी सेवा समिती, वकील संघ, ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून ठाणेदार अनिल कुंभरे, तालुका वकील संघाचे अध्यक्ष श्रीकांत वनपूरकर, अ‍ॅड.पोमेश्वर रामटेके, अ‍ॅड. गौरीशंकर अवचटे, अ‍ॅड.एम.एम. भाजीपाले, अ‍ॅड. टी.डी.कापगते व सरपंच राधेशाम झोळे, उपसरपंच वैशाली मानकर, पोलीस पाटील मंगला रामटेके उपस्थित होते. उपस्थित पक्षकार व सामान्य जनतेला कायदेविषयक मार्गदर्शन करताना अ‍ॅड.श्रीकांत बनपूरकर म्हणाले,समाजामध्ये वावरणाऱ्या प्रत्येक मानवाला कायद्याच्या माहितीसह जाणीव जागृती व्हावी, गरजू वंचितांना कायद्याचे पाठबळ मिळावे यासाठी विधी सेवा समितीच्या वतीने फिरते न्यायालयाचे उपक्रम राबविले जात आहे. ठाणेदार अनिल कुंभरे यांनी कायद्याच्या चाकोरीत राहूनच जीवन जगावे. कायदा हातात घेऊ नये. कायद्याच्या विरोधात जावून कुणीही कृत्य करु नये असे सांगितले. अ‍ॅड. भाजीपाले यांनी कायदे मनुष्याच्या रक्षण व हितासाठी बनविण्यात आले आहे. त्यांनी पोटगी, मुलींचा वारसान हक्क व आधुनिक तंत्रज्ञानसंबंधी जाणीव करुन दिली. अ‍ॅड. गौरीशंकर अवचटे यांनी लोकहितार्थ कल्याणासाठी विविध कायद्याची निर्मिती झाल्याचे सांगितले. सामोपचाराने तंट्यांचा निपटारा लोक अदालतीमधून करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. अ‍ॅड. कापगते यांनी प्रत्येकाला कायद्याची गरज आहे. जन्मापासून ते मरेपर्यंत मनवाला कायद्याची गरज असल्याचे सांगितले. दैनंदिन व्यवहारातील कायद्याची माहिती सामान्य जनतेला व्हावी. यासाठी फिरते न्यायालयाच्या माध्यमातून गावापर्यंत उपक्रम राबविले जात आहे. प्रास्ताविक अ‍ॅड. श्रीकांत बनपूरकर यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज पालीवाल यांनी केले तर आभार ग्रामविकास अधिकारी पी.एम. समरीत यांनी मानले. लोक अदालतीत परिसरातील न्यायालयीन प्रकरण आपसी निपटाºयासाठी ठेवण्यात आली होती. वादी-प्रतिवादींना समझोत्याने वाद सोडविण्यास प्रोत्साहित करण्यात आले.