शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

गराडा येथील प्राथमिक शाळेला लावले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 21:32 IST

पंचायत समिती गोरेगाव अंतर्गत येणाऱ्या गराडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला बुधवारी(दि.३) क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशीच स्थानिक शिक्षण विभागाने कुलूप लावले.

ठळक मुद्देशासनाचे आदेश : पालकांत असंतोष,विद्यार्थ्यांचे नुकसान

दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : पंचायत समिती गोरेगाव अंतर्गत येणाऱ्या गराडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला बुधवारी(दि.३) क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशीच स्थानिक शिक्षण विभागाने कुलूप लावले. त्यामुळे पालकांनी रोष व्यक्त करीत पाल्यांना शाळेतच न पाठविण्याचा पावित्रा घेतला आहे.महात्मा जोतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी अनेकांची टिका टिपणी व हालअपेष्टा सहन करुन शाळा उघडून ज्ञानाचे भंडार उघडले. तसेच विद्यार्थ्यांना संस्कारीत केले. मात्र प्रशासनाने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी गराडा येथील शाळेला कुलूप ठोकले. त्यामुळे पालकांमध्ये रोष व्याप्त आहे. गराडा हे घनदाट जंगलात वसलेले असून हे गाव कोअर क्षेत्र बफर झोनमध्ये येते. या शाळेत २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात पहिली, दुसरी व चौथ्या वर्गात एकूण आठ विद्यार्थी शिक्षण घेत होते. तर २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात पहिली, दुसरी व तिसऱ्या वर्गात एकूण ११ विद्यार्थी होते.गराडा प्राथमिक शाळेतील २०१७-१८ या शैक्षणीक वर्षातील ११ विद्यार्थ्याची प्राथमिक शाळा मुंडीपार शाळेत समायोजीत करण्यात येणार असल्याची माहिती आहे. परंतु मुंडीपार प्राथमिक शाळा गराडावरुन ३ किलोमीटर अंतरावर आहे. परिणामी तीन किलोमीटर अंतर पहिली व दुसरीचे विद्यार्थी पायी कसे जातील असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. शालेय व्यवस्थापन समिती गराडाने एक ठराव घेवून जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी यांना पत्र देऊन शाळा बंद न करण्याची विनंती केली होती. मात्र शिक्षण विभागाने शासन आदेशाचे पालन करीत बुधवारी (दि.३) शाळा बंद केली. गराडा शाळेतील शिक्षक आनंद गौपाले व शिक्षीका अनिता तुरकर यांचे मुंडीपार प्राथमिक शाळेत समायोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी यशवंत कावळे यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला असता त्यांनी शासनाच्या आदेशानुसार शाळा बंद करण्यात आल्याचे सांगितले.पालकांच्या विनंतीकडे दुर्लक्षज्या शाळेची पटसंख्या १० च्या आत असेल तर त्या शाळेतील विद्यार्थ्याना एक किमीच्या आतील चांगली गुणवत्ता असणाºया शाळेत समायोजीत करण्यात यावे असे आदेश आहे. मात्र सत्र २०१७-१८ या वर्षात या शाळेत ११ विद्यार्थी शिक्षण घेत असताना गराडा येथील शाळा बंद करण्यात आली. विषेश म्हणजे ही शाळा बंद करु नये असे पत्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.शिक्षण समितीच्या ठरावाचे कायजिल्हा परिषद शिक्षण सभापती पी.जी.कटरे यांनी शैक्षणिक सत्र संपल्याशिवाय कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यात येणार नाही, अशी ग्वाही दिली होती.जि.प.शिक्षण समितीच्या सभेत त्या संदर्भात ठराव सुध्दा पारित करण्यात आला होता. मात्र यानंतरही कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यात आल्याने पारित ठरावाचे काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.गराडा हे गाव कोअर क्षेत्र बफर झोनमध्ये येते. शाळा बंद केल्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होईल. या गावाजवळ प्राथमिक शाळा नाही, मुंडीपार शाळा तीन किलोमीटर आहे. त्यामुळे आम्ही गावकरी शाळेतच मुलांना पाठविणार नाही.शशेंद्र भगतसरपंच, ग्रा.पं.मुरदोली (गराडा)