शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

तीन बसफेऱ्यांचा शुभारंभ

By admin | Updated: January 20, 2015 00:08 IST

जिल्हा ते तालुका बसफेऱ्या नसल्याची ओरड अर्जुनी-मोरगाववासी अनेक दिवसांपासून करीत होते. रेल्वेचा प्रवास स्वस्त असूनही रेल्वेच्या वेळा बरोबर नसल्याने अर्जुनी-मोरगाववासीयांना

गोंदिया : जिल्हा ते तालुका बसफेऱ्या नसल्याची ओरड अर्जुनी-मोरगाववासी अनेक दिवसांपासून करीत होते. रेल्वेचा प्रवास स्वस्त असूनही रेल्वेच्या वेळा बरोबर नसल्याने अर्जुनी-मोरगाववासीयांना गोंदियाला ये-जा करण्यात मोठीच अडचण निर्माण होत होती. ही बाब हेरून गोंदिया आगाराने येत्या बुधवारपासून (दि.२१) गोंदिया-अर्जुनी/मोरगाव-लाखांदूर या मार्गावर तीन बसफेऱ्या सुरू करण्याचे ठरविले आहे.अर्जुनी-मोरगाव बस स्थानकाचे नुकतेच पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यामुळे या तिन्ही बसफेऱ्या सुरळीत संचालित होण्यासाठी अडचण निर्माण होणार नसल्याचे गोंदियाचे आगार व्यवस्थापक गौतम शेंडे यांनी सांगितले.पहिली बस गोंदिया आगारातून सकाळी ९ वाजता, दुसरी बस दुपारी २.४५ वाजता तर तिसरी बस सायंकाळी ५.३० वाजता अर्जुनी-मोरगावसाठी सुटणार आहेत. तसेच परतीच्या प्रवासात गोंदियासाठी या बसेस अर्जुनी-मोरगाववरून सकाळी ७ वाजता, दुपारी १२ वाजता व सायंकाळी ५ वाजता सुटतील. गोंदिया आगारातून अर्जुनी-मोरगावसाठी सायंकाळी ५.३० वाजता सुटणारी बस सायंकाळी ७.४५ वाजता अर्जुनीवरून लाखांदूरसाठी सुटेल व लाखांदूरला मुक्कामी राहील. यानंतर ती बस सकाळी ७.१५ वाजता लाखांदूरवरून सुटेल व सकाळी ७.४५ वाजता अर्जुनी-मोरगावला पोहचेल. तिथून सकाळी ८ वाजता गोंदियासाठी सुटेल.गोंदिया ते अर्जुनी-मोरगाव ये-जा करण्यासाठी सरळ बसफेऱ्या नसल्याने प्रवाशांची मोठीच गैरसोय होत होती. शिवाय या बसफेऱ्यांसाठी अनेक दिवसांपासून प्रवाशांची मागणी होती.