शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

मालगुजारी तलावांची दुरूस्ती व पुनर्स्थापना कामाचा शुभारंभ

By admin | Updated: January 12, 2016 01:41 IST

तालुक्यातील खैरी मालगुजारी तलाव विशेष दुरूस्ती व पुनर्स्थापना कामाचा शुभारंभ तलावाच्या धरणस्थळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले.

सामाजिक न्यायमंत्री बडोले : गाळ साचल्याने साठवण क्षमता झाली कमीसडक-अर्जुनी : तालुक्यातील खैरी मालगुजारी तलाव विशेष दुरूस्ती व पुनर्स्थापना कामाचा शुभारंभ तलावाच्या धरणस्थळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रम हरितक्रांती पाणी वापर सहकारी संस्था खोडशिवनी-खैरी व पाटबंधारे विभाग गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले.याप्रसंगी प्रामुख्याने कार्यकारी अभियंता एन.के. ढोरे, उपविभागीय अभियंता ए.एच. डोंगरे, तहसीलदार परूळेकर, माजी सरपंच माधवराव परशुरामकर, पोलीस पाटील भृंगराज परशुरामकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पतिराम परशुरामकर, उपसरपंच मनोहर परशुरामकर, उपसरपंच शिवदास परशुरामकर, पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष महादेव कापगते, सचिव अ‍ॅड. प्रकाश परशुरामकर, विलास समरित व दोन्ही गावातील शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी ना. बडोले म्हणाले, आपली शेती निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. शासनस्तरावर दुष्काळ नियोजनाचे उपाय केले जातात. परंतु निसर्ग कोणाच्या हाती नाही. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी ३०० वर्षांपूर्वी ज्या मालगुजारी तलावांची निर्मिती केली, त्यांच्यात आता गाळ साचल्यामुळे त्यांची साठवण क्षमता कमी झाली आहे. तसेच त्यांचे कालवे जीर्ण झाले आहेत. गेटचे बांधकाम करणे गरजेचे झाले आहे.त्यासाठी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मालगुजारी तलावांकरिता शासनाने १०० कोटींचा निधी मंजूर केलेला आहे. याच निधीमधून मालगुजारी तलावांची साठवन क्षमता वाढवून काही प्रमाणात दुष्काळावर मात करण्यात येईल. याकरिता जिल्ह्यातील सर्व मालगुजारी तलावांची दुरूस्ती करण्यात येईल. त्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे ते म्हणाले.याप्रसंगी कार्यकारी अभियंता ढोरे यांनी सांगितले की ९० लाख रूपये खर्चून खैरी तलावाची गाळ काढण्याचे कार्य पूर्ण झाले असून यानंतर गेट, पाटचाऱ्या व कालव्यांचे बांधकाम करण्यात येईल.संचालन भृंगराज परशुरामकर यांनी केले. आभार मनोहर परशुरामकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी शाखा अभियंता व्ही.एम. श्रीवास्तव, माधवराव परशुरामकर, ज्ञानिराम बन्सोड, सुभाष मेश्राम, वरखडे व हरित क्रांती पाणी वापर संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.