शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

मामा तलाव दुरूस्ती कामाचा शुभारंभ

By admin | Updated: January 17, 2016 01:32 IST

जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावातील क्षमता वाढावी व त्या माध्यमातून जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली यावे ..

गोंदिया : जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावातील क्षमता वाढावी व त्या माध्यमातून जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली यावे यासाठी सडक-अर्जुनी तालुक्यातील खैरी, माहुली येथील पाटबंधारे विभागाच्या अधिनस्त असलेल्या माजी मालगुजारी तलावांच्या विशेष दुरूस्ती व पुनर्स्थापना कामाचा शुभारंभ पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्ह्यात असलेले माजी मालगुजारी तलाव नादुरुस्त असल्यामुळे त्यांची पाणी साठवण क्षमता कमी होऊन सिंचनाचे क्षेत्र कमी झाले आहे. या तलावांच्या दुरूस्तीच्या कामामुळे शेतकऱ्यांची सिंचन क्षमता वाढून पिकांची उत्पादकता वाढण्यास मदत होणार असल्याचे ना.बडोले यावेळी म्हणाले. कार्यकारी अभियंता नरेंद्र ढोरे यांनी सांगितले की, ९० लक्ष रुपये खर्चून खैरी येथील तलावातील गाळ काढण्यात येईल. कालव्यांचे गेट व पाटचाऱ्यांची दुरूस्तीही करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष महादेव कापगते, सचिव अ‍ॅड. प्रकाश परशुरामकर, माजी सरपंच माधवराव परशुरामकर, पोलीस पाटील भृंगराज परशुरामकर, उपविभागीय अभियंता ए.एच.डोंगरे, तहसीलदार परूळेकर, शाखा अभियंता व्ही.एम.श्रीवास्तव, सुभाष मेश्राम व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. आभार मनोहर परशुरामकर यांनी मानले. (जिल्हा प्रतिनिधी)