शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम पैसेवारी ८९ पैसे

By admin | Updated: January 15, 2015 22:52 IST

यावर्षी कमी पावसामुळे बेजार झालेल्या शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील धानाला योग्य भाव किंवा बोनस मिळाला नाही. त्यातच आता अंतिम पैसेवारीही ५० पैशांपेक्षा जास्त असल्याचे प्रशासनाने जाहीर केले.

दोन गावांत दुष्काळ : ९१९ गावे राहणार मदतीपासून वंचितगोंदिया : यावर्षी कमी पावसामुळे बेजार झालेल्या शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील धानाला योग्य भाव किंवा बोनस मिळाला नाही. त्यातच आता अंतिम पैसेवारीही ५० पैशांपेक्षा जास्त असल्याचे प्रशासनाने जाहीर केले. त्यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी शासनाच्या कोणत्याही मदतीचा किंवा सवलतींचा लाभ मिळणार नाही.जिल्हा प्रशासनाने दि.१४ ला अंतिम पैसेवारीचा अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत राज्य शासनाकडे सादर केला. त्यात सडक अर्जुनी तालुक्यातील पिंडकेपार आणि म्हसवानी ही केवळ दोन गावे उत्पन्नाच्या बाबतीत ५० पैशांपेक्षा कमी आहेत. उर्वरित ९१९ गावांमधील उत्पन्न ५० पैशांपेक्षा जास्त, अर्थात सरासरी ८९ पैसे आहे. शासनाच्या अहवालानुसार पिकांच्या सर्वाधिक चांगली स्थिती गोंदिया तालुक्ताय (१.११ पैसे) तर सर्वात वाईट परिस्थिती गोरेगाव तालुक्यात (०.६३ पैसे) आहे.गेल्यावर्षी अतिवृष्टीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांची चिंता यावर्षी कमी पावसामुळे वाढली. पिकांची परिस्थिती गेल्यावर्षीच्या तुलनेत चांगली असली तरी गेल्यावर्षीप्रमाणे धानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस यावर्षी मिळाला नाही. त्यातच उत्पादन खर्च वाढला असताना हमीभावात केवळ ५० रुपयांची वाढ यावर्षी झाल्यामुळे शेतकरी समाधानी नाहीत. त्यामुळे धान उत्पादकांसाठी शासनाने विशेष पॅकेज द्यावे अशीही मागणी जोर धरत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)