शहरं
Join us  
Trending Stories
1
Corona Virus : वेळीच व्हा सावध! कोरोना हळहळू टेन्शन वाढवतोय; ५ दिवसांत १७०० रुग्णांची नोंद, ७ जणांचा मृत्यू
2
"ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने गुजरातवर मिसाईल्स आणि ६०० ड्रोन डागले, पण..."
3
टॉप सिक्रेट...! शी जिनपिंग यांची एकुलती एक मुलगी अमेरिकेत वास्तव्याला; ट्रम्प तिचा व्हिसा रद्द करणार? कोण आहे ती...
4
धक्कादायक! ८ वर्षांच्या मुलाची लोकांना भीती; सायकल चोरीचा 'मास्टरमाइंड', पोलीसही हैराण
5
नेत्याच्या नातेवाइकाविरोधात तक्रार; पोलिसांनी पीडितेला बसवून ठेवले, आरोपींना चहा पाजून सोडले
6
लज्जास्पद! केरळीयन लोकांच्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत; Video पाहून नेटकरी संतापले...
7
भारताच्या सीमेजवळ चुकूनही जाऊ नका, चिनी दूतावासाची आपल्या नागरिकांना सक्त सूचना, कारण काय?  
8
भारतानं मित्र सौदी अरेबियासाठी नियमांमध्ये दिली मोठी सूट; येणार मोठा पैसा, चीन पाकिस्तानचा जळफळाट होणार
9
४४ बॉलमध्ये ८४...! रोहित शर्मासोबत 'खेळणारा' तो जितेंद्र भाटवडेकर कोण? रणजी खेळलाय की गल्ली क्रिकेट...
10
डोळा सुजला, काळानिळा पडला, एलन मस्कला नेमकं मारलं कुणी? ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीत दिली माहिती   
11
रशियाच्या S-400 नं युक्रेनचं F-16 पाडलं, पुतिन यांनी जवानांना मोठं बक्षिस दिलं; अमेरिकेचं मात्र टेन्शन वाढलं!
12
Astrology: चाळीशी आली तरी लग्न ठरेना? याला ग्रहांची महादशा कारणीभूत असते का? वाचा!
13
Tarot Card: कासवाच्या गतीने का होईना, रोज थोडी प्रगती करा; जूनच्या पहिल्या आठवड्याचे टॅरो भविष्य!
14
प्रायव्हेट जेटमध्ये प्रवास, आलिशान घर आणि रोल्स रॉईसच्या मालक, कोण आहे ही महिला? पतीची संपत्ती ₹१८,३७० कोटी
15
'ऑपरेशन सिंदूरचे पुरावे हवे असतील तर...' ममता कुलकर्णीने राहुल गांधींवर साधला निशाणा
16
Vaishnavi Hagawane Death Case:वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजीकडे;बालकल्याण समितीचा मोठा निर्णय
17
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
18
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
19
भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा
20
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली

गोरेगावातील पशुवैद्यकीय दवाखान्यांना अखेरची घरघर

By admin | Updated: July 6, 2014 23:59 IST

तालुक्यात राज्यशासन व जिल्हा परिषदेचे एकूण सात पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. पण दवाखान्यात शासनाच्या मुबलक सुविधा नाही. पाण्याची व्यवस्था नाही, बोरवेल बंद आहेत वैद्यकीय अधिकारी

दिलीप चव्हाण - गोरेगावतालुक्यात राज्यशासन व जिल्हा परिषदेचे एकूण सात पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. पण दवाखान्यात शासनाच्या मुबलक सुविधा नाही. पाण्याची व्यवस्था नाही, बोरवेल बंद आहेत वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे दवाखान्याचा कारभार परिचर चालवतात. त्यामुळे शासनाच्या या पशुवैद्यकीय दवाखान्यांना अखेरची घरघर लागली आहे. प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील गोरेगाव, चोपा, कुऱ्हाडी, तेढा या गावात जिल्हा परिषद अधिनस्थ पशुवैद्यकीय दवाखाने चालविले जातात. हिरडामाली, मोहाडी, मुंडीपार हे तीन दवाखाने राज्य शासनाच्या अधिनस्थ आहेत. यापैकी गोरेगाव येथील दवाखान्यात तीन वर्षापासून बोरवेल बंद आहे. त्यामुळे या दवाखान्यात पाण्याची सोय नाही. कुऱ्हाडीच्या दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी नाही. त्यामुळे येथे जनावरावर उपचार परिचर करतात. तेढा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पाण्याची सोय नाही. येथे पाण्यासाठी कर्मचाऱ्यांना इतरत्र भटकावे लागते. हिरडामाली येथील दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी व पाण्याची सोय नाही. मोहाळीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातही पाणी व वैद्यकीय अधिकारी नाही. मुंडीपारच्या दवाखान्यात पाणी, परिचर व पशुवैद्यकीय अधिकारी नाही. सदर दवाखाना आठवड्यातून एकदा उघडला जातो. गोरेगाव तालुक्यात राज्यशासन व जिल्हा परिषद अधिनस्थ सात पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. पण शासनाच्या मुबलक सुविधा नसल्यामुळे पशुपालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. पशु दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे अनेकवेळा जनावरांचा उपचाराअभावी मृत्यू झाला आहे. पशुपालक उपचारासाठी दवाखान्यात जनावरे घेऊन येतात. तेव्हा पशुपालकांनाही जनावराच्या पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागते. गुराच्या जखमा धुण्यासाठी, हात धुण्यासाठी पशु दवाखान्यात पाणी मोठ्या प्रमाणावर लागतो.मात्र पाण्याची सोय नसल्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. एकीकडे पाण्याचा भीषण प्रश्न कायम असताना दुसरीकडे पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा अभाव पशुपालकांसाठी घातक ठरत आहे. शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी जनावरे पोसावे लागतात. बदलत्या हवामानामुळे व पावसाळ्यात जनावराना मोठ्या प्रमाणात रोग होण्याची संभावना राहते. मात्र रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी व योग्य उपचारासाठी पशुवैद्यकीय अधिकारी नाही ही मोठी समस्या आहे.