शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

२३ वर्षे लोटूनही गोवारी समाजाचा लढा सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:24 IST

२३ नोव्हेंबर १९९४ रोजी आदिवासी गोवारी समाज संघटनेद्वारे विधान भवन नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी करण्यात आलेल्या गोळीबारात १२४ गोवारी समाजबांधव शहीद झाले.

ठळक मुद्देशालिकराम नेवारे : गोवारी समाजाने एकत्र येण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कइंदोरा बुजरुक : २३ नोव्हेंबर १९९४ रोजी आदिवासी गोवारी समाज संघटनेद्वारे विधान भवन नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी करण्यात आलेल्या गोळीबारात १२४ गोवारी समाजबांधव शहीद झाले. या घटनेला २३ वर्ष पूर्ण झाली. मात्र आजही गोवारी समाजाला न्याय मिळाला नाही. २३ वर्षात केवळ गोवारी समाजाचा लोकप्रतिनिधींनी मतदानापुरताच उपयोग करुन दिशाभूल केल्याची टीका गोवारी समाज संघटनेच्या समन्वयक समितीचे अध्यक्ष शालिकराम नेवारे यांनी येथे आयोजित कार्यक्रमात केली.आदिवासी गोवारी समाज संघटना इंदोरा बुज.च्यावतीने आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी प्रमुख म्हणून शालिकराम नेवारे, अ‍ॅड. मंगेश नेवारे, डॉ. गुरुदास नेवारे, घनश्याम सोनेवाने, सरपंच प्रभा अंबुले, आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष मुरलीदास गोंडाणे, हेमराज अंबुले, माजी सरपंच राजेश रहांगडाले, वंदना मेश्राम, रविकांता ठाकरे, अरुणा वासनिक, पोलीस पाटील हितेश सोनेवाने, राधेश्याम नेवारे, रमेश कृपाले, बुद्धम् राऊत, इसन आंबेडारे, कवडू अंबुले, तोरणलाल सोनेवाने, देबीलाल अंबुले उपस्थित होते. नेवारे यांनी गोवारी समाजांनी आपआपसातील मतभेद विसरुन एका झेंड्याखाली येणार नाही तोपर्यंत १२४ आदिवासी गोवारी समाज शहीद बांधवांना खरी श्रद्धांजली ठरणार नाही. गोवारी समाजामधीेल जाती गोंड व गोवारी यांच्यामधील फरक तसेच कचारगढ येथील आदिवासीचे देवस्थान यावर मार्गदर्शन केले.मंचावर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सर्वप्रथम शहीद आदिवासी गोवारी बांधवांना आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून घनश्याम सोनेवाने यांनी संघटनेचे कार्य सांगितले. नेवारे यांनी समाजाला संघटीत होऊन लढा उभारण्याची गरज असल्याचे सांगितले. तर अ‍ॅड. मंगेश नेवारे यांनी २३ वर्षात झालेल्या राजकीय पक्षाकडून समाजाची उपेक्षे बाबत मार्गदर्शन करुन संपूर्ण महाराष्टÑातील आदिवासी गोवारी समाज बांधवांनी एकत्र येऊन न्यायालयीन लढ्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन टेकचंद चौधरी यांनी केले तर आभार खिलाश कृपाले यांनी मानले.यशस्वितेसाठी इसन आंबेडारे, करोडपती राऊत, राजू आंबेडारे, मारोती आंबेडारे, रमेश कृपाले, बुद्धल राऊत, पन्नालाल कवरे, सुखदास सोनेवाने, हौशीलाल शहारे, वसंत चौधरी, रामचंद चौधरी, दिलीप आंबेडारे, रवींंद्र शहारे, सहेषराम चौधरी, छाया राऊत, लक्ष्मी कवरे, भूमेश्वरी राऊत, कपील चौधरी, मिलींद चौधरी यांनी सहकार्य केले.