शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
3
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
4
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
5
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
6
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
7
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
8
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
9
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
10
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
11
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
12
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
13
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
14
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
15
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
17
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
18
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
19
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
20
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस

भूमाफियांकडून होत आहे प्लॉटधारकांची फसवणूक

By admin | Updated: December 15, 2014 22:58 IST

आमगाव तालुक्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रात भूमाफियांची टोळी सक्रिय असून प्लॉटधारकांची फसवणूक होत असल्याचा प्रकार उघडकीस येत आहे.

कालीमाटी : आमगाव तालुक्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रात भूमाफियांची टोळी सक्रिय असून प्लॉटधारकांची फसवणूक होत असल्याचा प्रकार उघडकीस येत आहे. तालुक्यात कुठेही आपला प्लॉट असेल तर त्या जागेवर बांधकाम करणे गरजेचे झाले आहे. कारण जमिनीचे दलाल सक्रीय असून गावात कुठलाही प्लॉट किंवा जमीन दाखवून त्याची खरेदी-विक्री करण्याचे प्रकार फोफावत आहे. बनगाव येथे नुकतेच सदर प्रकरण उघडकीस आले आहे. सन १९६९-७० या कालावधीत शेतकरी आपली शेतजमिन विक्री करीत होते. त्यावेळी ५० डिसमिलपेक्षा कमी जमिनीची रजिस्ट्री होत नव्हती. म्हणून खरेदी विक्रीचे व्यवहार एका स्टॉम्पवर लिहून घेतले जात असे, पण फेरफार होत नसत. त्यामुळे सात-बारावर विक्री करणाऱ्या जमीनमालकासह वारसांचे नाव आजही अस्तित्वात आहेत. यामुळे या जमीन किंवा प्लॉटमधून मार्ग कसा काढता येईल याची शक्कल भूमाफिया लढवत आहेत. वारसांना प्रलोभन देऊन सातबारा नकाशा घेणे आणि तलाठी भूमापन अधिकारी यांना वेठीस घेवून विक्री केलेला प्लॉट परस्पर दुसऱ्या अनोळखी व्यक्तीला विक्री करण्याचा गोरखधंदा परिसरात जोरात सुरू आहे. कामठा रोड परिसरात भूमाफियांनी एका प्लॉट मालकाला प्लॉट विक्री करण्याकरिता प्रथम दुसऱ्या व्यक्तीचा प्लाट दाखविला. नंतर त्याचे प्लॉट दाखवून सदर प्लाट विक्रीसाठी आहे, असा ठराव दाखविण्यात आला. त्यामुळे गृहस्थांनी सदर आपल्या मालकीच्या जमिनीचे बांधकाम मध्यरात्रीच करवून घेतले. यामुळे याप्रकरणी रिकाम्या प्लॉटवर भूमाफियांकडून विक्री केली जाणार नाही ना? अशी भिती ग्रामस्थ व प्लाटधारकांना वाटत आहे. या प्रकरणात अनेक लोक गुंतले आहेत. हे लोक परिसरात अशांतता व अराजकरता पसरवित आहेत. या प्रकरणाची तक्रार भूमापन, तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन आमगाव या ठिकाणी करण्यात आली आहे. सदर प्लॉटचे गट नंबर वेगवेगळे आहे किंवा एकच नंबर आहेत यासंदर्भात चौकशी होणार आहे. या प्रकरणी दोषी भूमाफियांवर कारवाईचा बडगा येणार असल्याची गावात चर्चा आहे.(तालुका प्रतिनिधी)