शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंची वसुली, मात्र क्षेत्रफळाबाबत अनभिज्ञ

By admin | Updated: September 25, 2015 02:23 IST

जिल्ह्यात विविध ठिकाणी आठवडी बाजाराचे विस्तीर्ण क्षेत्र आहे. जिल्हा परिषद दरवर्षी त्या क्षेत्राच्या लिलावाच्या माध्यमातून लाखोंची कमाई करते,

पंचायत विभागाचा कारभार : बाजाराच्या जमिनीवर धनदाडंग्यांचे अतिक्रमणअर्जुनी-मोरगाव : जिल्ह्यात विविध ठिकाणी आठवडी बाजाराचे विस्तीर्ण क्षेत्र आहे. जिल्हा परिषद दरवर्षी त्या क्षेत्राच्या लिलावाच्या माध्यमातून लाखोंची कमाई करते, मात्र आठवडी बाजाराची गावनिहाय नेमकी मालकीची किती जागा आहे यापासून जि.प.चे अधिकारी अनभिज्ञ आहेत. बाजाराच्या कोट्यवधीच्या या जमिनींवर धनदांडग्यांनी अतिक्रमण करुन त्या जमिनी बळकावल्या आहेत. याचा बाजारावर विपरीत परिणाम होत असून आठवडी बाजार गावागावातील रहदारीच्या रस्त्यावर भरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरकर यांनी घेतलेल्या माहितीच्या अधिकारातून हे वास्तव उघड झाले आहे. गोंदिया जिल्हा परिषदेतर्फे दरवर्षी जिल्ह्यातील २९ बैठकी, ३ गुरांच्या व ३ यात्रा बाजारांचा लिलाव होतो. यात गोंदिया तालुक्यातील मुरदाडा, कामठा, अदासी, रावणवाडी, दासगाव-बु. पांढराबोडी व काटी, तिरोडा तालुक्यातील आमगाव व टेरी, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील अर्जुनी-मोर व नवेगावबांध, सालेकस तालुक्यातील कोटजांभोरा, आमगाव खुर्द, जमाकुडो, पाथरी, व साकरीटोला, सडक-अर्जुनी तालुक्यातील सडक-अर्जुनी, सौंदड व पांढरी, गोरेगाव तालुक्यातील गोरेगाव, कुऱ्हाडी व चोपा तर देवरी तालुक्यातील सावली-डो, चिचगड व ककोडी येथील बैठकी बाजारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील सडक-अर्जुनी, पांढरी व सावली-डो येथे गुरांचा तर तिरोडा तालुक्याच्या सुकडी-डाकराम, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड व गोरेगाव तालुक्यातील पोंगेझरा येथे यात्रा बाजार भरतो. आठवडी बाजारातून जिल्हा परिषदेला भरपूर उत्पन्न मिळत असले तरी याबाबत जिल्हा परिषद मात्र गंभीर नाही. काही गावांमध्ये जिल्हा परिषद व काही ठिकाणी ग्रामपंचायत आपापल्या स्तरावर बाजारांचे लिलाव करते. या बाजाराच्या जागेवर स्थानिक धनदाडंग्यांनी अतिक्रमण केले आहे. बाजारात व्यापारी जिथे जागा मिळेल तिथे आपली दुकानदारी थाटतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. अनेक मोठ्या गावांमध्ये तर मुख्य रहदारीचे रस्तेच बंद झाले आहेत. यामुळे आता बाजाराच्या जागा स्थालांतरीत करणे आवश्यक झाले आहे. जिल्हा परिषदेच्या या कानाडोळा प्रवृत्तीमुळे दरवर्षी मिळणारा लाखो रुपयांचा महसूल बुडण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या बाजाराच्या जागेवर अतिक्रमण वाढत असले तरी जि.प. ची मालमत्ता असल्याने स्थानिक ग्रामपंचायती अशा अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करतात. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये हिच बोंब आहे. आठवडी बाजाराच्या या जागा मोक्याच्या ठिकाणी असल्याने त्यांचे बाजारमूल्य कोट्यवधीच्या घरात आहे. (तालुका प्रतिनिधी)