शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

सौंदड पुनर्वसन गावठाणात नागरी सुविधांचा अभाव

By admin | Updated: May 18, 2015 00:52 IST

विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द धरण पूर्णत्वाच्या मार्गावर असताना शासनाने धरणाचे पाणी २४२ मीटरपर्यंत अडविण्याची भूमिका ...

प्रकाश हातेल  चिचाळविदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द धरण पूर्णत्वाच्या मार्गावर असताना शासनाने धरणाचे पाणी २४२ मीटरपर्यंत अडविण्याची भूमिका घेतल्याने धरणाच्या बुडीत क्षेत्रातील सौंदळ गावाला पाण्याने वेढले असून काहीचे घरात पाणी शिरले आहे. मात्र पुनर्वसन गावठाणात अद्यापही १८ नागरी सुविधा पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे ग्रामस्थामध्ये रोष असून आधी पुनर्वसननंतरच स्थलांतरण करण्याचा पवित्रा सरपंच राजहंस भुते व ग्रामस्थांनी घेतला आहे.इंदिरा सागर गोसीखुर्द प्रकल्पाच्या पुनर्वसनात सौंदळ हे गाव प्रकल्पाच्या पोटात असून नदी शेजारी वसले आहे. गावात ३३८ कुटुंब व ७९२ लोकसंख्या आहे. प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर असून शासनाने पाणी अडविण्याची भूमिका घेतल्याने १३४ कुटुंबाचे गावठाण चकारा येथे स्थलांतरण झाले तर ज्यांना भुखंड मिळाले नाही त्यांचे घराचे चारही भोवती पाण्याने वेढले आहे. पाण्याशेजारील कुटुंब साप, विंचू आदी जलचर पाण्यापासून भीत भीत दिवस काठीत आहेत.पुनर्वसन गावठान चकारा येथे १३४ कुटुंबाचे स्थलांतरण झाले आहे. बाकी २०४ कुटुंब, शाळा, ग्रामपंचायत नवीन गावठाणात स्थलांतरण झाले नाही. त्यामुळे स्थलांतरित कुटुंबातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.शासनाने ज्यांना भूखंड दिले नाही त्यांना तत्काळ भूखंड द्यावे त्यामुळे ते जुने गावठाण सोडतील, जुने विद्युत मीटर नवीन पुनर्वसनातील घरी ट्रान्सफर करून द्यावे, पाण्याखाली आलेल्या सुरबोडी येथील शेतीचे अनुदान देण्यात यावे, नवीन गावठाणात मकान बांधकामासाठी पाण्याची व्यवस्था करावी व उघड्या विहिरीचे तोंडीचे बांधकाम करण्यात यावे, बंद हॅन्डपंप, विद्युत पथदिवे सुरू करावे. पाणी वाहून नेणारी नाही. जमीनदोस्त झाल्याने नालीचे बांधकाम नव्याने करण्यात यावे, प्रकल्पग्रस्तांना पेन्शन योजना व बीपीएलचा लाभ देण्यात यावा, कुटुंबाची संख्या पाहुण प्रकल्पग्रस्तांना शेती खरेदी करून द्यावी, जुन्या गावठाणातील वाढीव बांधकामाचा मोबदला देण्यात यावा, कलम ४ नंतर बांधकाम केलेल्या घराचा मूल्यांकन करून मोबदला देण्यात यावा, ढिवर समाज बांधवांना प्रकल्पात मच्छिमार करण्याचा अधिकार देण्यात यावा, ज्यांना नवीन गावठाणात भूखंड मिळाले, परंतु त्यांना पॅकेजचा लाभ मिळाला नाही, त्या कुटुंबांना लाभ देण्यात यावा, सौंदळ, खापरी येथील काही घर टॅक्सधारकांना भूखंड व पॅकेजचा लाभ मिळाला नाही त्यांना लाभ देण्यात यावा. सौंदळ, खापरी येथील हनुमान मंदिर व बौद्ध विहाराला भूखंड देण्यात यावा, प्रकल्पग्रस्तांना नोकरीऐवजी १५ लाख रूपये देण्यात यावे, सौंदळ गटग्रामपंचायतमधील सुरबोडी या गावाची शहानिशा करून त्याचे पुनर्वसन करण्यात यावे. नवीन गावठाणात १८ नागरी पूर्ण झाल्या नाहीत. त्या पूर्ण करून द्याव्या, प्रकल्पबाधित गावठाणातील व पुनर्वसन गावठाणातील संपूर्ण समस्या सोडविल्याशिवाय गाव सोडणार नाही, असे वरिष्ठांना निवेदन देवून सरपंच राजहंस भुते, उपसरपंच विजय निंबार्ते व प्रकल्पग्रस्तांनी मागणी केली आहे.