शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वणवा रोखणाऱ्या यंत्रणेचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 23:52 IST

मागील वर्षी जिल्ह्यातील जंगलामध्ये आग लागल्याच्या २१९ घटना घडल्या. मात्र यानंतरही वन विभाग व शासनाने यापासून कसलाच धडा घेतलेला नाही.

ठळक मुद्देवन विभाग निधीच्या प्रतीक्षेत : वर्षभरात आगीच्या २१९ घटना

ऑनलाईन लोकमतगोंदिया : मागील वर्षी जिल्ह्यातील जंगलामध्ये आग लागल्याच्या २१९ घटना घडल्या. मात्र यानंतरही वन विभाग व शासनाने यापासून कसलाच धडा घेतलेला नाही. जंगलातील आगीच्या घटनांना प्रतिबंध लावण्यासाठी ‘फायर ब्लोअर’ची खरेदी करण्यासाठी या विभागाकडे निधीच उपलब्ध नसल्याची बाब उघडकीस आली आहे.दरवर्षी उन्हाळ्यात जंगलात आग (वनवा) लागण्याच्या घटना घडतात. मार्च महिन्यानंतर उन्हाळा तीव्र होत असल्याने जंगलात आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे बोलल्या जाते.गोंदिया जिल्ह्यातील काही भागात तेंदूपत्ता तोडणी मोठ्या प्रमाणात केली जाते. यातून वनविभागाला कोट्यवधी रूपयांचा महसूल मिळतो. त्यामुळे मागील काही वर्षांपासून जंगलात आग लागल्यास यासाठी तेंदूपत्ता कंत्राटदारांना जबाबदार ठरविले जात होते. तेव्हा तेंदूपत्ता कंत्राटदारानी तेंदूपत्ता लिलावावर बष्हिकार टाकला होता. त्यामुळे वनविभागाला आपला निर्णय मागे घ्यावा लागला. जंगलात आग लावल्यानंतर तेंदूपत्ता अधिक प्रमाणात येत असल्याचे बोलल्या जाते. कुठल्याही कारणामुळे आग लावली जात असली तरी यात वनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मागील वर्षी जिल्ह्यातील जंगलामध्ये आग लागल्याच्या २१९ घडल्या. त्याचा फटका ३५७.२८१ हेक्टरमधील वनसंपदेला बसल्याची नोंद वनविभागाच्या रेकार्डवर आहे. गोंदिया तालुक्यातील जंगलात २१, तिरोडा २१, गोरेगाव २, आमगाव ३, सालेकसा ११, उत्तर देवरी १४, दक्षिण देवरी २३, चिचगढ २६, सडक अर्जुनी १०, नवेगावबांध ३९, गोठणगाव २५ व अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्रात २४ घटना घडल्या.जंगलातील आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी २५४ फायर ब्लोअर वनविभागाकडे आहे. मात्र जिल्ह्यातील एकूण वन क्षेत्र आणि आगीच्या घटना पाहता अजून ९० फायर ब्लोअर खरेदीचा प्रस्ताव वन विभागाने शासनाकडे पाठविला होता. मात्र निधी उपलब्ध न झाल्याने हा प्रस्ताव तसाच थंडबस्त्यात आहे. जंगलातील वनवे रोखण्यासाठी जाड रेषा तयार करण्यात आली आहे. यासाठी काही प्रमाणात बाहेरील मजुरांची मदत घेतली जाते. जाड रेषेमुळे झाडाची वाळलेली पाने झाडांपासून दूर ठेवण्यास मदत होत असते. मात्र फायर ब्लोअर असल्यास आगीच्या घटनावर वेळीच नियंत्रण मिळविण्यास मदत होते. मात्र शासनाकडून वन विभागाला निधी उपलब्ध होत नसल्याने फायर ब्लोअर खरेदी रखडली आहे.