शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

चक्रीवादळामुळे लाखो रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 23:31 IST

देवरी तालुक्यातील डोंगरगावला बुधवारी (दि.१५) सायंकाळी आलेल्या चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला. चक्रवादामुळे डोंगरगाव येथील ३०० वर घरांची पडझड झाली. तर विद्युत खांब आणि मोठ्या प्रमाणावर झाडे देखील कोसळली. चक्रीवादळ पावसाचा फटका शेतीला सुध्दा बसला असून यामुळे ७० ते ८० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल महसूल विभागाने सादर केला आहे.

ठळक मुद्दे३०० घरांची पडझड : शेतकऱ्यांना फटका, मदतकार्याला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देवरी तालुक्यातील डोंगरगावला बुधवारी (दि.१५) सायंकाळी आलेल्या चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला. चक्रवादामुळे डोंगरगाव येथील ३०० वर घरांची पडझड झाली. तर विद्युत खांब आणि मोठ्या प्रमाणावर झाडे देखील कोसळली. चक्रीवादळ पावसाचा फटका शेतीला सुध्दा बसला असून यामुळे ७० ते ८० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल महसूल विभागाने सादर केला आहे.जिल्हावासीय देशाच्या ७२ व्या वर्धापन दिनाचा सोहळा साजरा करीत असताना दुसरीकडे देवरी तालुक्यातील डोंगरवासीयांवर अस्मानी संकटाला तोंड द्यावे लागले. बुधवारी (दि.१५) सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास आलेल्या चक्रीवादळ व पावसामुळे काहीच क्षणात गावात होत्याचे नव्हते झाले. चक्रीवादळामुळे अनेक गावकऱ्यांच्या घरावरील छत उडाले. तर काहींच्या घरांची भिंती कोसळली तर कुणाचे गोठा कोसळला. तर गावातील तीन जणांचे घर पूर्णपणे जमीनदोस्त झाले. चक्रीवादळामुळे गावातील २८ विद्युत खांब व नऊशेवर झाडांची पडझड झाली. दरम्यान दीड ते दोन तास मुळसळधार पाऊस आणि चक्रीवादामुळे गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. चक्रीवादामुळे डोक्यावरील छत हरविल्याने बऱ्याच गावकऱ्यांनी रात्र जागून काढली. गुरुवारी (दि.१६) दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर गावकऱ्यांनी वादळामुळे उडालेले सामान गोळा करण्याच्या कामाला सुरूवात केली. विशेष म्हणजे प्रशासनाचे अधिकारी या गावात तब्बल १६ तासानंतर मदतीसाठी पोहचले. आ.संजय पुराम यांनी डोंगरगावला सकाळीच भेट देवून गावातील नुकसानीची पाहणी केली. तसेच त्वरीत मदत कार्य सुरू करण्याचे निर्देश देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे यांना दिले. डोंगरगाव येथील सर्व नागरिकांच्या जेवनाची व राहण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. दरम्यान यानंतर मदत कार्याला सुरूवात झाली. जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी या सर्व प्रकाराची दखल घेत झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरीत करण्याचे निर्देश दिले. चक्रीवादळामुळे छत्र हरपलेल्या नागरिकांची सोय सुभाष हायस्कूल येथे केली. महसूल विभागाने चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकाºयांकडे शनिवारी (दि.१८) सादर केला. त्यात चक्रीवादळामुळे २७७ घरांचे अशंता तर ३० घरांचे पूर्णत: नुकसान झाले. २८ विद्युत खांब कोसळल्याने वीज वितरण कंपनीचे ७ लाख रूपयांचे नुकसान झाले.तर शेतीचे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले. वादळामुळे ९०० झाडांची पडझड झाली. यामुळे डोंगरगाव येथील गावकऱ्यांचे ६० लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नुकसानग्रस्तांना लवकरच आर्थिक मदतीचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आहे.गावकऱ्यांना ताडपत्रीचे वाटपचक्रीवादळामुळे डोंगरगाव येथील अनेक गावकऱ्यांच्या घरावरील छत उडाले. यामुळे त्यांच्यावर उघड्यावर राहण्याची पाळी आली आहे. दरम्यान त्यांचे पावसापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे १४२ गावकऱ्यांना ताडपत्रीचे वाटप करण्यात आले.अनेकांनी दिली डोंगरगावला भेटचक्रीवादळाचा फटका बसलेल्या डोंगरगावला विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट दिली. माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी, जिल्हा काँग्रेसचे सहषसराम कोरोटे यांच्यासह अन्य मान्यवरांनी भेट देवून नुकसानग्रस्तांना त्वरीत मदत देण्याची मागणी केली आहे.चक्रीवादळामुळे डोंगरवासीयांच्या झालेल्या नुकसानीचे त्वरीत सर्वेक्षण करुन त्यांना आर्थिक मदत करण्यात यावी. तसेच येथील गावकऱ्यांना दैनदिन उपयोगाच्या वस्तुंचा प्रशासनाने पुरवठा करावा.- टोलसिंग पवार, माजी जि.प.अध्यक्ष..............................................चक्रीवादळचा फटका बसलेल्या गावकऱ्यांना आवश्यक ती मदत पुरविण्याचे काम प्रशासनातर्फे युध्द पातळीवर सुरू आहे. गावकऱ्यांना ताडपत्रीचे वाटप करण्यात आले असून इंधनासाठी प्रती कुटुंब दोन लिटर रॉकेल देण्यात आले. नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविला आला आहे.- विजय बोरुडे, तहसीलदा देवरी.