शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

ढिसाळ नियोजनाने लाखो लीटर पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:36 IST

एकीकडे जिल्ह्यातील जनता पाणी टंचाईच्या समस्येने चिंताग्रस्त असताना दुसरीकडे मात्र प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. आसोली आणि आंभोऱ्याजवळ गुरूवारी (दि.१२) कालवा फुटल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला शिवाय पाणी टंचाईच्या समस्येत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देदोन ठिकाणी फुटला कालवा : दुरूस्तीचे काम सुरू, पाणी टंचाईची समस्या गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : एकीकडे जिल्ह्यातील जनता पाणी टंचाईच्या समस्येने चिंताग्रस्त असताना दुसरीकडे मात्र प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. आसोली आणि आंभोऱ्याजवळ गुरूवारी (दि.१२) कालवा फुटल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला शिवाय पाणी टंचाईच्या समस्येत वाढ झाली आहे.गोंदिया शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्याचा निर्णय १० एप्रिलला घेतला. त्यानंतर ११ एप्रिलला पुजारीटोलाचे पाणी सोडण्यात आले. हे पाणी कालव्याव्दारे डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविले जाणार आहे. यामुळे शहराला नियमित पाणी पुरवठा करणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला शक्य होणार आहे. मात्र पुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्यापूर्वी जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग आणि सिंचन विभाग यांच्यात योग्य समन्वय केले नाही. कालव्यात पाणी सोडण्यापूवी कालव्यांची स्थिती योग्य आहे का? याची चाचपणी सिंचन विभागाने केली नाही. दरम्यान पुजारीटोला धरणातून २५० क्यूसेक पाणी सोडल्यानंतर हे पाणी सालेकसा तालुक्यातील आंभोºयाजवळ पोहचले तर यापासूनच काही अंतरावर असलेल्या आसोलीजवळ पाणी पोहचल्यानंतर कालव्याला मोठे भगदाड पडले. त्यामुळे लाखो लीटर पाणी शेतांमध्ये वाहून गेले. परिणामी डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत गुरूवारी (दि.१२) पाणीच पोहचले नाही. त्यामुळे गोंदिया शहराच्या पाणी टंचाईच्या समस्येत आणखी भर पडली. प्रकल्पाचे पाणी सोडण्यापूर्वी या विभागाने योग्य नियोजन केले असते तर लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला नसता असे बोलले जात आहे. आंभोरा आणि आसोलीजवळ कालव्याला मोठे भगदाड पडले असून त्याची दुरूस्ती करण्यासाठी किमान तीन चार दिवसांचा कालावधी लागू शकतो. मात्र सिंचन विभागाचे अधिकारी शुक्रवारी (दि.१३) सायंकाळपर्यंत दुरूस्तीचे काम पूर्ण होण्याचा दावा करित आहे. मात्र यासर्व प्रकारामुळे पुन्हा एकदा या तिन्ही विभागाच्या ढिसाळ नियोजनाची पोलखोल झाली आहे.चूक प्रशासनाची फटका शहरवासीयांनापुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्यापूर्वी प्रशासनाने योग्य नियोजन केल्याने शहरावरील पाणी टंचाईच्या संकटात अधिक वाढ झाली आहे. मागील महिनाभरापासून शहरात अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने पाण्यासाठी शहरवासीयांची भटकंती सुरू आहे. त्यातच कालवा फुटल्यामुळे डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पाणी पोहचण्यास विलंब होणार आहे. त्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला अजून काही दिवस तोंड द्यावे लागणार आहे.अतिआत्मविश्वास नडलादोन महिन्यापूर्वीच भूजल सर्वेक्षण विभागाने संभाव्य पाणी टंचाईची शक्यता वर्तविली होती. त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला दिला होता. तेव्हाच प्रशासन उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र जेव्हा पाणी टंचाईची समस्या गंभीर होईल तेव्हाच उपाय योजना करु असा आत्मविश्वास जिल्हा प्रशासन आणि मजीप्राच्या अधिकाºयांनी बाळगला. त्यामुळे शहरवासीयांना आता पाणी टंचाईच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे.