शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
2
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 
3
'राईचा पर्वत केला'; सरन्यायाधीश गवईंनी प्रोटोकॉल प्रकरणात याचिका करणाऱ्या वकिलाला झापले
4
पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल
5
Astrology: जून देणार 'या' पाच राशींच्या नशिबाला गती, येणार अच्छे दिन, बदलणार स्थिती!
6
IPL 2025 Final वरून मोठा राडा ! BCCI च्या निर्णयावर बंगाल सरकारचा घणाघाती आरोप
7
‘७५ वर्षं जगला, खूप झालं, आता पाकिस्तानचे फार दिवस उरलेले नाहीत’, योगी आदित्यनाथ यांचा इशारा 
8
IPL 2025: शुभमन गिल- ऋषभ पंतमध्ये वाद सुरू? मैदानातील व्हिडीओ समोर आल्यानंतर चर्चांना उधाण
9
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
10
Shani Dosha: शनि महादशेचा त्रास तान्ह्या बाळांनाही होतो का? काय आहे त्यावर उपाय? जाणून घ्या!
11
राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; महावितरणकडून ‘हाय अलर्ट’ जारी
12
रोहित- विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? गंभीरनं एका वाक्यात दिलं उत्तर!
13
जसप्रीत बुमराहने वाढवलं BCCIचं टेन्शन, टीम इंडियातून इंग्लंड दौऱ्यावर फक्त इतकेच सामने खेळणार
14
ज्यांनी ट्रेनिग दिले त्यांनाच डसला! AI ने मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या घालविल्या
15
मुंबई-दिल्ली महामार्गावर कार थांबवली, महिलेसोबत सुरू केले अश्लील चाळे, भाजपा नेत्याचा व्हिडीओ व्हायरल 
16
२५ लाख रोजगार, ७५ हजार कोटींची गुंतवणूक! मुकेश अंबानी 'या' राज्यातील तरुणांचं बदलणार भविष्य
17
भारत पाकिस्तानला आणखी एक दणका देण्याच्या तयारीत; FATF ग्रे लिस्टमध्ये येणार पाक...
18
'धरीला पंढरीचा चोर' गाण्यातील 'मुक्ता'ने जिंकलं प्रेक्षकांचं मन! सध्या काय करते अभिनेत्री?
19
Ritual: 'हुंडा देणे' ही कुप्रथा भारतीय संस्कृतीत वा इतिहासात नव्हतीच, मग आली कुठून?
20
शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाले? डिमॅट अकाउंट कायमचं कसं बंद करायचं? 'ही' आहे सोपी पद्धत

प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक सुविधांचा अभाव

By admin | Updated: September 27, 2014 01:55 IST

प्राथमिक आरोग्य केंद्र वडेगाव येथे अस्वच्छता असल्याचा आरोप रुग्णांनी केला.

तिरोडा : प्राथमिक आरोग्य केंद्र वडेगाव येथे अस्वच्छता असल्याचा आरोप रुग्णांनी केला. गरोदर माता व कुटुंबनियोजन करणाऱ्या महिलांना फक्त एक-दोन गोळ्या दिल्या जातात. सायरपचा साठाच नसल्याने रुग्णांमध्ये असंतोष आहे. फॉलीक अ‍ॅसीड व कॅल्शियमच्या गोळ्या देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. योग्य काळजी घेत नसल्याचा आरोप रुग्णांनी केला आहे. आरोग्य केंद्रात फार्मसिस्ट यासारखे पद रिक्त असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. रूग्णालयात भरती असलेल्या ज्योती सोयाम भजेपार, हेमलता मेश्राम, ज्योत्स्ना योगेश्वर कटरे वडेगाव, शिल्पा बिसेन खेडेपार, पौर्णिमा बिसेन वडेगाव, रत्नकला पटले खेडेपार यांनी योग्य औषधोपचार व डॉक्टरांची सकाळी दररोज भेट नसून सायरप न दिल्याचा आरोप सदर प्रतिनिधीकडे केला आहे.पिण्याच्या पाण्याच्या जागेत अस्वच्छता दिसून आली असून विविध योजनांच्या तसेच दर्शनी भागावरील फलकावरील माहिती अद्यावत केलेली नव्हती. डॉक्टरांची बदली झाली असली तरी त्यांचेच नाव फलकावर होते.या दवाखान्याच्या बाबतीत अनियमितता असल्याच्या पं.स. सदस्यांच्या तोंडी तक्रारीवरून खंड विकास अधिकारी पं.स. तिरोडा व पं.स. सदस्य शंकर बिंझाडे यांनी भेट देवून चौकशी केली. त्यात विविध चुका दिसून आल्या. रोख पुस्तिका व बँकेचा ताळमेळ बसत नाही, अशा त्रुट्या असून रोख पुस्तिकेमधील जि.प., पं.स. लेखासंहिता १९६८ मधील तरतुदीप्रमाणे लिहावे. शिर्षकनिहाय जमा-खर्च लिहावे, मासिक गोषवारा काढावा, रेकार्ड अद्यावत करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश खंड विकास अधिकारी जमईवार यांनी दिले.एक डॉक्टर व फार्मसिस्टचे पद रिक्त असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. पदांची भरती करावी अशी जनतेची मागणी आहे. येथील रुग्णांना ‘रेफर टू तिरोडा-गोंदिया’ येथे थोड्या थोड्या कारणासाठी पाठविल्या जात असल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे. ओपीडी रजिस्टरवर खोडतोड करून चिठ्ठ्या चिपकवल्याचे निदर्शनात आले आहे. रजिस्टरवर लिहिण्याचे काम कुणाचे आहे? याबाबत संभ्रमाची स्थिती दिसून आली. रूग्णालयात रुग्णांना योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी जनतेने केली आहे. (शहर प्रतिनिधी)