शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

मैदानावरील साधनाअभावी तरुणांची होतेय गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 05:00 IST

गोंदिया जिल्ह्याच्या टोकावर नागझिरा अभयारण्याच्या कुशित वसलेल्या सीतेपार (ता.तिरोडा) आणि परिसरातील गावांतील तरूणांची देश सेवेसाठी भारतीय सैन्यात भर्ती होण्याची तडफड सुरू आहे. तिरोडा तालुक्यातील सीतेपार, खेडेपार परिसरातील २० गावाच्या मध्यस्थानी सीतेपार येथे असलेल्या मोकळ्या मैदानात परिसरातील ७० ते ८० युवक घाम गाळून मेहनत करीत असतात.

लोकमत न्यूज नेटवर्कवडेगाव : देश सेवेचा ध्यास घेवून सैन्यात जाण्यासाठी सज्ज असलेले काही युवक एकत्र आले मात्र मैदानावर कुठल्याही सोयी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे तरुणांची प्रचंड गैरसोय होत आहे.गोंदिया जिल्ह्याच्या टोकावर नागझिरा अभयारण्याच्या कुशित वसलेल्या सीतेपार (ता.तिरोडा) आणि परिसरातील गावांतील तरूणांची देश सेवेसाठी भारतीय सैन्यात भर्ती होण्याची तडफड सुरू आहे. तिरोडा तालुक्यातील सीतेपार, खेडेपार परिसरातील २० गावाच्या मध्यस्थानी सीतेपार येथे असलेल्या मोकळ्या मैदानात परिसरातील ७० ते ८० युवक घाम गाळून मेहनत करीत असतात. परंतु मैदानात सुविधांची वाणवा असल्यामुळे सरावात अडचणी निर्माण होत आहेत.यावर मात करण्यासाठी तरुणांनी बेरोजगार असतानाही पदरमोड करून मैदानावर स्वखचार्ने तुटपुंजे का असेना एक दोन साधने बसवली आहेत. सीतेपार-खेडेपार परिसरातील कुणाल रहांगडाले, सुमित पटले, मुकुल झंझाड, संगम रहांगडाले, मनोज बघेले, आकाश कटरे, खोमेश ठाकरे, जितेंद्र माहुरले, पिंटु पटले,अक्षय रहांगडाले, सुहास हजारे, सोपान तुमसरे, रविंद्र पारधी, अमित पडोळे, शुभम रहांगडाले, संस्कार माहुरले, विकी रहांगडाले या तरूणांनी खेडेपार येथील मैदानावर सरावाला सुरूवात केली.या तरूणांना बघुन हळुहळु इतर तरूणही प्रेरित झाले. सुरूवातीला पंधरा ते वीसच्या घरात असणारी ही संख्या बघता बघता शंभराच्या घरात पोहचली आहे. वाढती बेरोजगारी आणि उच्च शिक्षणाची संधी यांच्या व्यस्त समीकरणाने मेटाकुटीला आलेल्या ग्रामीण तरूणाला सैन्य भरतीच जवळची वाटु लागते. यासाठी हे तरूण घाम गाळत आहेत.या तरूणांना मैदान जरी उपलब्ध असले तरी इतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मैदानावर शारीरिक कसरतीसाठी आवश्यक असणाऱ्या साधनांची कमतरता नेहमीच भासत असते.यासाठी या बेरोजगार तरूणांनी पदरमोड करून स्वखचार्ने तुटपुंज्या का असेना साहित्याची खरेदी करून ते मैदानात लावली आहे. तुटपुंज्या साधनांच्या सहाय्याने युवकांचा सराव सध्या सुरू आहे.