शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

तिरोडा एसटी आगारात सुविधांचा अभाव

By admin | Updated: May 26, 2017 00:35 IST

नागरिकांच्या सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या व राज्य परिवहन महामंडळाला उत्पन्न मिळवून देणाऱ्या एसटी बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत.

महिला वाहक विश्रामगृहात घाणलोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : नागरिकांच्या सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या व राज्य परिवहन महामंडळाला उत्पन्न मिळवून देणाऱ्या एसटी बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत. जिल्ह्यात वाहतूक प्रवासात अधिक महसूल देणारा तिरोडा आगार भंगार झाला आहे. या आगाराचे व्यवस्थापक चोपकर यांच्या निष्काळजीपणामुळे या ठिकाणी हळू-हळू दिवसेंदिवस सुविधांचा अभाव होत आहे. तिरोडा आगारामध्ये ७६ वाहक व ७१ चालक असून ४२ शेड्युल १२५ फेऱ्या रोज होतात. उत्पन्न पण चांगलेच आहे. यात १० महिला वाहक व २ दुरुस्ती विभागात यांत्रिक पदावर आहेत. पण या महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र विश्रामगृह नाही. त्यांच्यासाठी साधी चांगली खोलीसुद्धा उपलब्ध नाही. या बस स्थानकात विश्रामगृहाची केवळ पाटी लावली आहे. पण प्रत्यक्षात तेथे संपूर्ण केरकचरा पडला असतो. गोदामासारखी स्थिती असताना तेथे बसतात तरी कसे? हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. याबाबत एका कर्मचाऱ्याला विचारपूस केली असता त्याने हेच महिला विश्रामगृह असल्याचे सांगितल्यावर धसकाच बसला. घाणेरडा विश्रामगृह, संपूर्ण कचरा, पंखा बरोबर नाही, तीव्र उष्णता असताना कुलरची सोय कुठेच नाही. भर उन्हाचे चटके खात प्रवाशांची सेवा करणाऱ्या वाहन चालकांसाठी विश्रांतीची सोय नाही. त्यामुळे काम करण्याची त्यांच्यात मानसिकता कशी काय तयार होईल? अशा प्रश्न उपस्थित झाला आहे. शासन एसटी वाहतूक विभागात प्रवाशांच्या सोयीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करतो. हा पैसा जातो कुठे, मुरतो कुठे, काही पत्ताच नाही. कर्मचारीच सोयी-सुविधांपासून वंचित आहेत. वाहक बाहेर जाऊन भोजन करतात. महिला वाहक कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. फोन सुविधेचाही अभावच आहे. कित्येक कर्मचाऱ्यांनी सुविधांचा अभाव होत असून याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे आगार व्यवस्थापकांना सांगितले. पण त्यांचे सातत्याने दुर्लक्षच होत आहे. आगारात जिकडे-तिकडे घाण पसरली आहे. सफाईचा अभाव दिसून येतो. खासगी वाहनधारक काळी-पिवळीचे चालक बसस्थानकातून प्रवासी घेऊन जातात, याकडेही दुर्लक्ष होत आहे.या आगारातील बसेस भंगारासारखे झाले असून कुठेही बस पंचर होऊन किंवा तांत्रिक बिघाड होवून उभी राहते. कित्येकदा प्रवाशांना तासनतास बसची वाट पहावी लागते. नागरिक तक्रारी करतात, पण त्यांची ऐकणार कोण? यासाठी काही प्रवासी खासगी वाहनांनी प्रवास करणे पसंत करीत आहेत. याकडे लोकप्रतिनिधी, संबंधित वरिष्ठ अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी लक्ष पुरवून प्रवाशांच्या सुविधा वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.महिला वऱ्हांड्यातच पाजतात बाळांना दूधहिरकणी कक्ष महिलांसाठी स्वतंत्र तयार केले, पण तिरोडा आगारात कुठेही महिलांसाठी हिरकणी कक्ष आढळले नाही. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची पास तयार केली जाते, त्या ठिकाणी हिरकणी कक्ष म्हणून लिहिलेले दिसते. पण सुविधांचा अभाव. कित्येक महिला उघड्यावर पडदा झाकून आपल्या लहान बाळांना रखरखत्या उन्हात वरांड्यात दूध पाजताना दिसतात. याकडे आगार प्रमुखांचे लक्ष वेधण्यात आले आहे.