शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

हजार मुलांमागे ६४ मुलींची कमतरता

By admin | Updated: March 8, 2017 01:00 IST

मुलगा वंशाचा दिवा समजणाऱ्या लोेकांना कायद्याचा वचक बसलाच नाही. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मुलींच्या जन्मात २१ ने घट झाली आहे.

नरेश रहिले  गोंदिया मुलगा वंशाचा दिवा समजणाऱ्या लोेकांना कायद्याचा वचक बसलाच नाही. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मुलींच्या जन्मात २१ ने घट झाली आहे. सन २०१५-१६ या वर्षात एक हजार पुरूषामागे ९५७ मुली जन्माला आल्या होत्या. परंतु यावर्षी सन २०१६-१७ या वर्षात एक हजार पुरूषामागे ९३६ मुली जन्माला आल्याची जिल्ह्याची आकडेवारी दर्शविते. या बातमीने पुन्हा सामाजिक असमतोल होत असल्याची जाणीव होत आहे. सन २००१ या वर्षी जिल्ह्याचे पुरूषाच्या तुलनेत मुलीचे जन्मदर १००५ होता. त्यानंतर २००९-१० मध्ये ९२९ झाला. सन २०१०-११ मध्ये ९५४, २०११-१२ पुन्हा ९२९ झाला. परंतु सन २०१२-१३ या वर्षात सदर ९७२ वर गेला. परंतु त्यानंतर सतत मुलींचे जन्मदर घटत राहीले. सन २०१३-१४ मध्ये ९४४, २०१४-१५ मध्ये ९५२ होता. २०१५-१६ यावर्षी मुलींच्या आकड्यात वाढ झाली होती. दर हजारी पुरूषांमागे ९५७ मुली जन्माला आल्या होत्या.परंतु यंदा सन २०१६-१७ या वर्षात घटून ९३६ वर हा आकडा आला आहे. मुलगी वाचवा, मुलगी शिकवा हे अभियान फक्त नावापुरते राहीले आहे. जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात सुधारणा झाली नाही. यामुळे स्त्रीभू्रणहत्या होत असल्याचे म्हणता येईल. सालेकसा व गोंदिया तालुक्यात अत्यंत वाईट स्थिती आहे. आदिवासी व नक्षलग्रस्त जिल्ह्यात सन २००१ मध्ये चांगली स्थिती होती.परंतु त्यानंतर सतत मुलींच्या जन्मदरात घट होतांना दिसत आहे. जिल्ह्यात मागील दहा महिन्यातील मुला-मुलींच्या जन्मदरावर दृष्टीक्षेप टाकल्यास जिल्ह्याच्या स्थितीत सुधारणा झाली नाही. जिल्ह्याच्या गोंदिया तालुक्यात ९१३, सालेकसा तालुक्यात एक हजार पुरुषांमागे ८३४ मुलींना जन्म दिला. जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यात १०४७, तिरोडा १०१४, देवरी १००२, सडक-अर्जुनी ९८२, गोरेगाव ९४९ व अर्जुनी-मोरगाव येथे ९३६ आहे.